Sonakshi Sinha's photo taken in Thailand is viral, but why? | सोनाक्षी सिन्हाचे थायलॅण्डमधील फोटो झाले व्हायरल, पण का?

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा काही दिवसांपासून बॉलिवूडचा टायगर सलमान खान याच्या आगामी ‘दबंग-३’ या चित्रपटावरून चर्चेत आहे. परंतु सोनाक्षी बॉलिवूडला सोडून विदेशात पोहोचली आहे. होय, सोनाक्षी सिन्हाचे काही फोटोज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये सोनाक्षी खूपच बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे. यातील काही फोटो सोनाक्षीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. सध्या सोनाक्षी थायलॅण्ड येथे सुट्या एन्जॉय करीत आहे. थायलॅण्डमधील विविध पर्यटनस्थळी सोनाक्षी भेट देत आहे. 
 

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका फोटोमध्ये सोनाक्षी थायलॅण्डमधील एका हॉटेलमध्ये दिसत आहे. ब्लू शर्ट आणि ब्लू जीन्स परिधान केलेली सोनाक्षी फिश स्पाचा आनंद घेत आहे, तर दुसरा एक फोटो शेअर करताना सोनाक्षीने त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘नेचर लव’ या फोटोमध्ये सोनाक्षी रेन फॉलजवळ बसलेली आहे. या फोटोंबरोबर सोनाक्षीने इतरही बरेचसे फोटो तिच्या अकाउंटवर शेअर केले आहेत. वास्तविक सोनाक्षी सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह आहे. ती नेहमीच तिचे काही फोटोज् सोशल मीडियावर शेअर करीत असते. 
 

दरम्यान, सोनाक्षी सलमान खानच्या ‘दबंग-३’मध्ये झळकणार काय? याविषयी तर्कवितर्क लावले जात आहेत. काही दिवसांपूर्वीच अरबाज खानने एका मुलाखतीत सोनाक्षीच्या रोलवरून वक्तव्य केले होते. त्याने म्हटले होते की, सोनाक्षीची भूमिका ‘दबंग-३’मध्ये कायम असेल. परंतु त्याचबरोबर इतरही काही अभिनेत्री प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहे.
Web Title: Sonakshi Sinha's photo taken in Thailand is viral, but why?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.