Sonakshi Sinha's dream was fulfilled | ​सोनाक्षी सिन्हाचे हे स्वप्न झाले पूर्ण

लहानपणापासूनच आपण भविष्यात काय बनायचे हे प्रत्येकाने ठरवलेले असते. कधी कोणाला डॉक्टर, इंजिनियर तर कोणाला अभिनेता बनायचे असते. पण नियतीमुळे मोठे झाल्यावर प्रत्येक जण वेगवेगळ्या क्षेत्रात जातात. काहीच जणांना आपले लहानपणापासूनचे स्वप्न पूर्ण करता येते. तुम्हाला माहीत आहे का, या क्षेत्रातील अनेक कलाकारांना या झगमगत्या दुनियेत यायचेच नव्हते. तर एका वेगळ्या क्षेत्रात त्यांना करियर करायचे होते. पण ते नकळत या क्षेत्राकडे ओढले गेले. 
तुम्हाला माहीत आहे का सोनाक्षी सिन्हाला अभिनेत्री नव्हे तर एक अंतराळवीर बनायचे होते. पण तिच्या नशिबात अभिनेत्री बनणेच असल्याने ती या क्षेत्राकडे वळली आणि आज तिने या क्षेत्रात प्रगती देखील केली आहे. ती लहान असताना तिला आपण अंतराळवीर व्हावे, असे वाटत होते. तिने एकदा आपल्या आई-वडिलांना सांगितले देखील होते की, “मला चंद्रावर जायचे आहे!” पण कळायला लागल्यानंतर तिने वेगळे करियर निवडले आणि तिचे हे स्वप्न अपूूर्णच राहिले. पण एका लघुपटामुळे नुकतेच तिचे हे स्वप्न पूर्ण झाले. 
‘डॉटर्स डे’निमित्त ‘स्टार प्लस’ वाहिनीसाठी सोनाक्षी सिन्हाचा भाऊ कुश सिन्हा एक लघुपट बनवणार आहे. या लघुपटात सोनाक्षीनेच काम करावे अशी कुशची इच्छा होती. पण सोनाक्षी तिच्या कामात व्यग्र होती. मात्र भावाच्या इच्छेखातर तिने तिच्या वेळापत्रकात बदल करून नुकतेच या लघुपटाचे चित्रीकरण केले. या लघुपटात ती अंतराळवीराची भूमिका साकारत आहे. त्यामुळे या लघुपटाचे चित्रीकरण करत असताना तिचे लहानपणीचे स्वप्न पूर्ण झाले.
पडद्यावर का होईना पण अंतराळवीरची भूमिका साकारायला मिळत आहे या कल्पनेने सोनाक्षी प्रचंड खूश झाली होती. चित्रीकरणाच्या दिवशी ती खूपच उत्साहित असल्याने वेळेच्या आधीच ती सेटवर पोहोचली आणि तिने अंतराळवीर बनण्याची तयारी सुरू केली. अंतराळवीर झाल्यावर आपल्याला काय हवे आहे, त्याची एक छोटी यादीही तिने यावेळी तयार केली होती. अंतराळवीराचे कपडे घातल्यानंतर तर तिला प्रचंड आनंद झाला होता. 
‘डॉटर्स डे’निमित्त बनवल्या जात असलेल्या लघुपटात सोनाक्षी प्रेक्षकांना एका वेगळ्या रूपात पाहायला मिळणार आहे. 

Also Read : 'या' व्यक्तीमुळे सोनाक्षी सिन्हाने सलमान खानला वाट पाहायला लावली
 
Web Title: Sonakshi Sinha's dream was fulfilled
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.