सोनाक्षी सिन्हाचे 'ह्या' अभिनेत्यावर आहे क्रश

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 1970 06:03 AM1970-01-01T06:03:38+5:302018-10-31T21:00:00+5:30

बॉलिवूडमधील दबंग गर्ल म्हणजेच अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने कमी कालावधीत बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. नुकतेच तिने आपल्या लग्नाबद्दल खुलासा केला आहे.

Sonakshi Sinha's crush on this actor | सोनाक्षी सिन्हाचे 'ह्या' अभिनेत्यावर आहे क्रश

सोनाक्षी सिन्हाचे 'ह्या' अभिनेत्यावर आहे क्रश

googlenewsNext
ठळक मुद्देसोनाक्षी सिन्हाचे हृतिक रोशनवर आहे क्रश

बॉलिवूडमधील दबंग गर्ल म्हणजेच अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने कमी कालावधीत बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. नुकतेच तिने आपल्या लग्नाबद्दल खुलासा केला आहे.

बॉलिवूडमध्ये सध्या सेलिब्रिटींची लगीनघाई सुरू आहे. दीपिका-रणवीर आणि प्रियांका चोप्रा व निक जोनास लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. अशातच सोनाक्षी सिन्हाने आपल्या लग्नाबद्दल काही गोष्टींचा खुलासा केला. सोनाक्षीने एका मुलाखतीत, मी ज्या व्यक्तीसोबत लग्न करेल त्याने मला पूर्णपणे स्पेस द्यायला हवा. मला बंधनात न ठेवता स्वतंत्रपणे जगण्याची मुभा दिली पाहिजे. लग्नाबद्दल बोलले तर, तुम्ही कोणत्याही व्यक्तीसोबत लग्न करा मात्र, चूकीच्या माणसासोबत आयुष्य घालवू नका. 
यावेळी सोनाक्षीने अभिनेता हृतिक रोशनवर क्रश असल्याचे सांगितले. जेव्हा 'कहो ना प्यार है' या चित्रपटात हृतिकला पहिल्यांदा पाहिले होते तेव्हापासून त्याच्यावर क्रश असल्याचे तिने म्हटले. सोनाक्षी सध्या भलेही सिंगल असली तरी बंटी सचदेवासोबत तिच्या अफेअर असल्याच्या चर्चा सुरू होत्या. बराच काळ दोघे रिलेशनशिपमध्ये असून काही कारणास्तव दोघांचे ब्रेकअप झाले होते. 
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणजेच आमीर खान व दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा लवकरच एकत्र झळकणार आहेत. ते दोघे पहिल्यांदाच एकत्र रुपेरी पडद्यावर काम करताना दिसणार आहेत. डीएनएच्या रिपोर्टनुसार, या चित्रपटात आमीर खानसोबत महत्त्वाच्या रोलसाठी सोनाक्षी सिन्हाला साइन केले आहे. संजय दत्त बायोपिकसारखे 'मुघल'मध्ये दोन-तीन अभिनेत्री दिसणार आहेत. त्यातील एका महत्त्वाच्या भूमिकेत अभिनेत्री सोनाक्षी दिसणार आहे.
सोनाक्षी सिन्हाच्या भूमिकेबद्दल बोलले जात आहे की, हा जास्त मोठा रोल नसणार आहे. पण, महत्त्वाचा असणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार सोनाक्षीला या सिनेमाची स्क्रीप्ट खूप आवडली असून तिने या चित्रपटात काम करण्यास होकारही दिला आहे. आमीर व सोनाक्षीला एकत्र स्क्रीनवर पाहणे कमालीचे ठरणार आहे. 

Web Title: Sonakshi Sinha's crush on this actor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.