Sonakshi Sinha will appear in a historical film | ​सोनाक्षी सिन्हा दिसणार एका एेतिहासिक चित्रपटात

आर माधवन आणि सैफ अली खान यांनी रहना है तेरे दिल मैं या चित्रपटात एकत्र काम केले होते. या चित्रपटातील त्यांची टशन आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. या चित्रपटानंतर आता अनेक वर्षांनी ते दोघे एका चित्रपटात एकत्र झळकणार आहेत. हा चित्रपट एक एेतिहासिक चित्रपट असून या चित्रपटाची सध्या जोरदार तयारी सुरू आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन एनएच १० या चित्रपटाचे दिग्दर्शक नवदीप सिंग करणार आहेत. या चित्रपटाच्या टीममधील आता आणखी एका कलाकारची भर पडली आहे. सोनाक्षी सिन्हा देखील आता या चित्रपटाचा भाग झाली आहे. सोनाक्षीने याआधी सैफसोबत बुलेट राजा या चित्रपटात काम केले होते तर माधवनसोबत काम करण्याची तिची ही पहिलीच वेळ आहे. 
सोनाक्षीची या चित्रपटात भूमिका काय असणार याबाबत चित्रपटाच्या टीमने मौन बाळगणेच पसंत केले आहे. पण या चित्रपटात तिची एक महत्त्वाची भूमिका असून तिच्या भूमिकेमुळे कथानकाला एक वेगळे वळण मिळणार असल्याचे म्हटले जात आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण गेल्या आठवड्यापासून सुरू झाले असून चित्रीकरण राजस्थानमध्ये केले जात आहे. सोनाक्षी देखील राजस्थानला नुकतीच पोहोचली असून सोनाक्षीने देखील या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. राजस्थानधील देसुरी गावात या चित्रपटाचे चित्रीकरण सध्या सुरू असून पुढील चित्रीकरण राजस्थानमधील विविध भागांमध्ये केले जाणार आहे. तसेच उत्तर प्रदेशमध्ये देखील या चित्रपटाचे चित्रीकरण होणार आहे. या चित्रपटात सैफ अली खान आणि माधवन एका वेगळ्या लूकमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. हे दोघेही सध्या आपल्या लूकवर प्रचंड मेहनत घेत आहेत. 
सोनाक्षी सिन्हा ही प्रसिद्ध अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची मुलगी असून सलमानन खानने तिला बॉलिवूडमध्ये पहिला ब्रेक दिला. सलमानच्या दबंग या चित्रपटात ती त्याच्या नायिकेच्या भूमिकेत दिसली होती. या चित्रपटानंतर तिने रावडी राठोड, हॉलिडे यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. आता तर सोनाक्षी सिन्हाला बॉलिवूडमधील यशाचा फॉर्म्युला गवसला आहे. 

Also Read : ​​करण जोहरची चाहती धरून बसली वेगळाच हट्ट! सेटवर घातला गोंधळ!!
Web Title: Sonakshi Sinha will appear in a historical film
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.