Sonakshi Sinha dubbing girl divorces Singhal; Ajay's 'Big' film is worst! | दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हाने बॉलिवूडच्या सिंघमला डिवचले; अजयच्या ‘या’ चित्रपटाला म्हटले सर्वांत वाईट!

सोनाक्षी सिन्हा बॉलिवूडमधील त्या अभिनेत्रींपैकी एक आहे, जिने इंडस्ट्रीतील सीनियर अ‍ॅक्टर्ससोबत अधिक चित्रपट केले आहेत. शिवाय त्यातील बहुतांश चित्रपट सुपरहिट झाले आहेत. सुपरस्टार सलमान खानच्या ‘दबंग’मधून आपल्या करिअरला सुरुवात करणाºया सोनाक्षीची गणना आज इंडस्ट्रीतील यशस्वी अभिनेत्रींमध्ये केली जाते. अक्षयकुमारसोबतचा ‘राउडी राठोड’, अजय देवगणचा ‘सन आॅफ सरदार’ या चित्रपटांनी प्रेक्षकांची मने जिंकली. परंतु अजयसोबतचा तिचा ‘अ‍ॅक्शन जॅक्सन’ फारसा यशस्वी राहिला नाही. याचे शल्य अजूनही सोनाक्षीला वाटत असल्याचे दिसून आले. 

‘बीएफएफए विद वोग’ या चॅट शोमध्ये सोनाक्षी फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा याच्यासोबत सहभागी झाली होती. या शो ची होस्ट अभिनेत्री नेहा धुपिया हिने सोनाक्षीला बॉलिवूडमधील प्रवासाविषयी अनेक प्रश्न विचारले. याचे उत्तर देताना सोनाक्षीने म्हटले की, ‘अ‍ॅक्शन जॅक्सन’ तिच्या करिअरमधील सर्वांत वाईट चित्रपट होता. सोनाक्षीने म्हटले की, मी आणि जूनो चोपडा एकत्र चित्रपट करण्यास नेहमीच तयार असतो. इंडस्ट्रीतील प्रत्येक दिग्दर्शक आणि निर्माता माझ्यासोबत वारंवार चित्रपट करू इच्छितात. कारण एकदा त्यांनी माझ्यासोबत काम केल्यानंतर दुसºया अभिनेत्रींचा ते विचारच करीत नाही. अर्थात हे सर्व सोनाक्षी चेष्टामस्करीत बोलत होती. पुढे बोलताना सोनाक्षीने म्हटले की, जूनोची अशी इच्छा होती की, मी ‘अ‍ॅक्शन जॅक्सन’मध्ये काम करायला हवे. परंतु हा चित्रपट फारसा प्रभाव टाकू शकला नाही. त्यानंतर ते माझ्याकडे ‘इत्तेफाक’ घेऊन आले. नशीब हा चित्रपट चालला. आता पुन्हा एकदा ते माझ्याकडे आले असून, त्यांच्या डोक्यात काहीतरी भन्नाट कल्पना असल्याचे सोनाक्षीने सांगितले. 

दरम्यान, सोनाक्षीच्या या वक्तव्यामुळे बॉलिवूडचा सिंघम अजय देवगण संतापण्याची शक्यता आहे. कारण तिने हे वक्तव्य करून ‘अ‍ॅक्शन जॅक्सन’च्या अपयशाचे खापर अजय देवगणवरच फोडले की काय? असे वाटत आहे. आता अजय त्यास उत्तर देणार काय? हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 
Web Title: Sonakshi Sinha dubbing girl divorces Singhal; Ajay's 'Big' film is worst!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.