Sonakshi Sinha on Dabangg Salman Khan's muscles! | दबंग सलमान खानच्या मसल्सवर सोनाक्षी सिन्हा झाली फिदा!

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने सुपरस्टार सलमान खान याच्यासोबत ‘दबंग’ या ब्लॉकबस्टर चित्रपटातून बॉलिवूडमध्ये धमाकेदार एंट्री केली. त्यानंतर सोनाक्षीचा बॉलिवूडमधील प्रवास असा काही राहिला की, तिने अल्पावधीतच यशस्वी अभिनेत्रींच्या यादीत स्थान मिळविले. आतापर्यंत सोनाक्षीने अनेक हिट चित्रपट दिले. त्याचबरोबर इंडस्ट्रीतील सीनिअर अभिनेत्यांसोबत काम करण्याचे भाग्यही तिला लाभले. सध्या ती आगामी ‘वेलकम टू न्यूयॉर्क’ या चित्रपटात पंजाबी अभिनेता आणि गायक दिलजीत दोसांझ यांच्यासोबत काम करीत आहे. मात्र हा चित्रपटदेखील तिला भाईजान सलमानमुळेच मिळाल्याची चर्चा आहे. या चित्रपटात सलमानने एका गाण्यात कामही केले आहे. याविषयी सोनाक्षीने म्हटले की, ‘वेलकम टू न्यूयॉर्क’मधील एका गाण्यास सलमानसोबत काम करण्याचा अनुभव खूपच रोमांचक राहिला आहे. ‘नैन फिसल गए’ या गाण्यात सोनाक्षी सिन्हा ड्रीम सीक्वेन्समध्ये सलमान खानसोबत बघावयास मिळत आहे. 

सलमान आणि सोनाक्षीचे हे ड्रीम सॉँग सध्या चांगलेच हिट होताना दिसत आहे. या गाण्याची शूटिंग न्यूयॉर्क येथे झाली. सोनाक्षीने सांगितले की, ‘दबंग आणि दंबग-२’ नंतर सलमानसोबत या गाण्यात काम करण्याचा अनुभव खूपच अविस्मरणीय असा राहिला आहे. संपूर्ण गाण्याची शूटिंग न्यूयॉर्क येथे झाली. या गाण्यामुळे अनेक आठवणींना उजाळा मिळाला. या रोमॅण्टिक गाण्याला अतिशय उत्तमरीत्या शूट करण्यात आले. गाण्यास संगीत साजिद-वाजिद यांनी दिले. तर गाण्याचे बोल कौसर मुनीर यांचे आहेत.’दिग्दर्शक चकरी तोलेटीने सांगितले की, या गाण्याची शूटिंग केल्यानंतर आम्ही खूप एन्जॉय केला. पडद्यावर सलमान आणि सोनाक्षीची केमिस्ट्री जबरदस्त असल्याचे बघावयास मिळाले. पूजा फिल्म्स आणि विज फिल्म्सद्वारा निर्मित हा चित्रपट दोन युवकांच्या कॉमेडीवर आधारित आहे. चित्रपट २३ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. सोनाक्षी व्यतिरिक्त चित्रपटात करण जोहर, दिलजीत दोसांझ, रितेश देशमुख, बोमन इराणी आणि लारा दत्ता यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. 
Web Title: Sonakshi Sinha on Dabangg Salman Khan's muscles!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.