चित्रपटसृष्टीत येण्यासाठी बदलले आडनाव


अमिताभ बच्चन यांचा जन्म अलाहाबाद, उत्तरप्रदेश येथे झाला. त्यांचे वडील डॉ. हरिवंशराय बच्चन हे हिंदीतील सुप्रसिद्ध कवी होते तर त्यांची आई तेजी बच्चन या मुळच्या फैसलाबाद (पाकिस्तान) येथील हिंदू शीख कुटुंबातील होत्या. अमिताभ यांच्या वडिलांचे मूळ आडनाव श्रीवास्तव असले तरी बच्चन (बालसुलभ) या टोपणनावाने ते कविता प्रसिद्ध करीत. चित्रपटसृष्टीत प्रवेश करताना अमिताभ यांनी हे टोपणनाव आडनाव म्हणून वापरायला सुरुवात केली आणि पुढे संपूर्ण कुटुंबाचेच बच्चन हेच आडनाव व्यवहारात रूढ झाले. अमिताभ यांच्या वडिलांचे २००३ मध्ये तर आईचे २००७ मध्ये निधन झाले.

हरिवंश राय बच्चन यांच्या दोन मुलांपैकी अमिताभ मोठे. त्यांच्या भावाचे नाव अजिताभ आहे. त्यांच्या आईला रंगभूमीची आवड होती आणि त्यांना एका फिल्ममध्ये भूमिकाही देऊ करण्यात आली होती. मात्र त्यांनी त्याऐवजी घर सांभाळण्याला प्राधान्य दिले.

 कुठे शिकले बिग बी

बच्चन अलाहाबादच्या ज्ञानप्रबोधिनी आणि बॉईज हायस्कूलमध्ये शिकले. त्यांनी नैनितालच्या शेरवूड कॉलेजमध्ये कलाशाखेत शिक्षण घेतले त्यानंतर त्यानी दिल्ली विद्यापीठाच्या किरोडीमल महाविद्यालयातून त्यांनी विज्ञानशाखेतली पदवी संपादन केली. ऐन विशीत कोलकत्यातील एका जहाजवाहतूक कंपनीतील एजंटाची नोकरी सोडून देऊन अभिनयात कारकीर्द करण्याचा निर्णय अमिताभ यांनी घेतला.


अनटोल्ड लव्हस्टोरी

  दो अंजाने या चित्रपटाच्या सेटवर रेखा आणि अमिताभच्या प्रेमाचा अंकुर बहरला. या चित्रपटानंतर रेखाची इमेज पुर्णपणे बलली, तिच्या करिअरमधील टर्निंग पाईटं हा चित्रपट असल्याचे बोलले जाते. 

 

 रेखा आणि अमिताभ नेहमी सिक्रेटली रेखाच्या एका मैत्रिणीच्या बंगल्यात भेटायचे. परंतु एके दिवशी अमिताभ यांचा पारा सुटला आणि त्यांनी गंगा की सौगंध या चित्रपटाच्या सेटवर रेखाच्या सहकलाकाराशी तिच्या वरुनच भांडण केली. त्यावेळी त्यांच्या अफेअर्सची चर्चा सर्वत्र झाली. 

 ऋषी कपूर आणि नितू सिंगच्या लग्नामध्ये रेखा सिंदुर आणि गळ््यात मंगळसुत्र घालुन गेली होती. त्यावेळी सर्वांचेच लक्ष तिने वेधून घेतले. अमिताभ-रेखाने यावेळी गपचूप लग्न केल्याचे देखील बोलले गेले. 

 

 सिलसीला ही या दोघांचीही शेवटची फिल्म होती. यश चोप्रा यांनी त्यावेळी असेही सांगितले होते की, मला भीती वाटतेय की यांची रिअल लाईफ हळूहळू रिलमध्ये उतरत आहे. कारण त्यामध्ये जया अमिताभची पत्नी होती तर रेखा गर्लफ्रेन्ड. 

  अमिताभजींचे काही दुर्मिळ फोटो 

       

       
 
Web Title: Some things I do not know about Amitabh Bachchan ...
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.