Some scenes of Tiger Shroff and direction Patni's Baghi 2 were leaked ... | ​टायगर श्रॉफ आणि दिशा पटानीच्या बागी २ या चित्रपटातील काही दृश्य झाली लीक... दोघांना बसला आश्चर्याचा धक्का

टायगर श्रॉफ आणि दिशा पटानीच्या बागी २ या चित्रपटाचा व्हिडिओ लीक हे वाचून तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसला असेल. कारण हा चित्रपट प्रदर्शित व्हायला कित्येक महिने बाकी आहेत. दिशा आणि टायगर सध्या त्यांच्या बागी २ या चित्रपटावर प्रचंड मेहनत घेत आहेत. पण या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळेसची काही दृश्य लीक झाली आहेत. या दृश्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरला झाला आहे. या व्हिडिओमध्ये टायगर अॅक्शन सीन करताना आपल्याला दिसत आहे. एवढेच नव्हे तर त्यात दिशा आणि टायगर एका मार्केटमध्ये एकमेकांना हार घालून लग्न करत असल्याचे देखील पाहायला मिळत आहे. 
बागी हा चित्रपट मार्च महिन्यात प्रदर्शित होईल असे म्हटले जात आहे. पण प्रदर्शनाच्या कित्येक महिने आधीच या चित्रपटातील अतिशय महत्त्वाचा भाग ऑनलाइन लीक झाला आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी उपस्थित असलेल्या लोकांनी ही दृश्यं लीक केली असल्याचे म्हटले जात आहे. बागी २ या चित्रपटातील क्लायमॅक्सच लीक झाला असल्याची चर्चा आहे.
बागी या चित्रपटात टायगर श्रॉफ आणि श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत झळकले होते. या चित्रपटाला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली होती. विशेष म्हणजे या चित्रपटातील टायगर श्रॉफच्या अॅक्शनची चांगलीच चर्चा झाली होती. या चित्रपटाच्या यशानंतर बागी २ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात देखील प्रेक्षकांना टायगरच मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे. पण बागी २ मध्ये टायगरच्या नायिकेच्या भूमिकेत श्रद्धा कपूर नव्हे तर दिशा पटानी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 
टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी गेल्या अनेक महिन्यांपासून नात्यात आहेत. त्यामुळे त्यांच्या या चित्रपटाची प्रेक्षकांना चांगलीच उत्सुकता लागली आहे. या चित्रपटातही टायगर खूप सारी अॅक्शन करताना प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 
बागी या चित्रपटाचे चित्रीकरण मुंबई, पुणे, मनाली या ठिकाणी झाले असून काही चित्रीकरण थायलंड आणि चीनमध्ये देखील होणार आहे. तसेच काही दृश्यांच्या चित्रीकरणासाठी ते गोव्याला आणि लडाकला देखील जाणार आहेत. 

Also Read : टायगर श्रॉफ आपली गर्लफ्रेंड दिशा पटानीसोबत गेला परदेशात नव्या वर्षाच्या स्वागतासाठी
Web Title: Some scenes of Tiger Shroff and direction Patni's Baghi 2 were leaked ...
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.