Soha Ali Khan and Kunal Khemu's daughter entry on Instagram | सोहा अली खान आणि कुणाल खेमूच्या मुलीची इन्स्टाग्रामवर एन्ट्री

सोहा अली खानने आपल्या मुलीचे म्हणजे इनाया नौमी खेमुचे फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यात कुणाल खेमुने इनायाला आपल्या हातात पकडले आहे.
बॉलिवूडमध्ये नुकताच डॅडी बनलेला कुणाल खेमु बाबा बनल्याचा अनुभव घेतो आहे. कुणाल सध्या त्याच्या आगामी चित्रपट गोलमाल अगेनच्या प्रोमोशन मध्ये व्यस्त आहे.  तरीसुद्धा तो आपल्या मुलीसाठी वेळ काढत आहे. २९ सप्टेंबरला ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये सोहा अली खानने मुलीला जन्म दिला. सोहाने वडील आणि मुलीचा एक क्षण कॅमरामध्ये टिपला आणि तो  इन्स्टाग्रामवर पोस्ट केला.  सोहाने इनायाचा हा पहिलाच फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.


कुणाल आणि सोहा २०१५ मध्ये विवाह बंधनात अडकले होते. कुणालने आपल्याला मुलगी झाल्याची गोड बातमी स्वतःच्या ट्वीटर अकाऊंटवर दिली होती. त्याने लिहिले होते की, "मला तुम्हाला कळविण्यात आनंद होत आहे की आजच्या चांगल्या दिवशी आमच्या घरी एक सुंदर मुलीचा जन्म झाला आहे, तुमच्या सगळ्यांनी दिलेल्या प्रेम आणि आशीर्वादबद्दन मी आपला आभारी आहे"

इनायाच्या जन्मा आधी सोहाने सांगितले होते की ह्या काळात करीना कपूर खानचे मला सल्ला मिळाले. ती नुकतीच आई झाली आहे त्यामुळे तिचे सल्ले माझ्यासाठी मोलाचे ठरले. मी तिच्यावर प्रश्नाचा सतत भडीमार करायचे. मी काय खावे काय खाऊ नये वगैरे.

ALSO READ : पाहा ​तैमूरच्या बहिणीचा फोटो आला समोर

कामाच्या बाबतीत बोलायचे झाले तर बातमी अशी आहे की सोहा अली खान तिग्मांशू धुलिया 'साहेब बिवी और गँगस्टर ३' मध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असल्याचे कळते आहे. याबाबतीत अजून कोणतिही अधिकृत माहिती मिळालेली नाही.  सध्या सोहा आणि कुणाल दोघे ही एक हिट चित्रपटाच्या शोधात आहेत. साहेब बिवी और गँगस्टर ३'  या चित्रपटात संजय दत्त सुद्धा असणार आहे. वास्तवमध्ये एका गँगस्टरची भूमिका संजय दत्तने साकारली होती आणि ती प्रेक्षकांच्या देखील पसंतीस उतरली होती. वास्तवनंतर पुन्हा एक गँगस्टर मोठ्या पडद्यावर साकारायला संजूबाबा तयार झाला आहे. साहेब बिवी अँड गँगस्टर' या चित्रपटाच्या सीरिजचे आधी दोन भाग येऊन गेले आहेत.
Web Title: Soha Ali Khan and Kunal Khemu's daughter entry on Instagram
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.