So, what Nayanakar did with Vignesh Shiva? | ​तर काय नयनताराने विग्नेश शिवनसोबत केला साखरपुडा?

गत आठवड्यात श्रीया सरन हिने रशियन बॉयफ्रेन्ड एंड्रे कोसचिनसोबत लग्न केले. आता साऊथची आणखी एक अभिनेत्री लग्नबंधनात अडकण्यास तयार आहे. होय, आम्ही बोलतोय ते साऊथची लेडी सुपरस्टार नयनतारा हिच्याबद्दल. नयनतारा आणि चित्रपट दिग्दर्शक विग्नेश शिवन यांच्या रिलेशनशिपची चर्चा ब-याच दिवसांपासून सुरु आहे. या  दोघांचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पण  नयनताराने याबद्दल चुप्पी साधली होती. पण अलीकडे एका इव्हेंटमध्ये नयनताराने हे गुपित अखेर सगळ्यांसोबत शेअर केलेच. होय, विग्नेश केवळ बॉयफ्रेन्ड नसून आपला होणारा पती आहे, हे तिने जाहिर केले. चेन्नईतील एका अवार्ड शोमध्ये नयनताराला एका पुरस्काराने गौरविण्यात आले. पुरस्कार स्वीकारण्यासाठी नयनतारा स्टेजवर गेली आणि पुरस्कार स्वीकारल्यानंतर सर्वांचे आभार मानतांना आपल्या होणा-या नव-याचेही तिने आभार मानले. मॉम, डॅड , माझा भाऊ आणि माझा होणारा पती सगळ्यांचे मी आभार मानते. त्यांच्या पाठिंब्यामुळेच मी इथे आहे, असे नयनतारा म्हणाली. आता हा मंगेतर कोण, याचा अंदाज बांधणे लोकांसाठी कठीण नव्हतेच.Naanum Rowdydhaan  या चित्रपटाद्वारे विग्नेशने दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवले. या चित्रपटात नयनतारा लिड रोलमध्ये होती. याच चित्रपटाच्या सेटवर नयनतारा व विग्नेश एकमेकांच्या प्रेमात पडले. २०१५ मध्ये आलेला हा चित्रपट सुपरडुपर हिट ठरला होता. यानंतर २०१६ मध्ये सिंगापुरच्या एका अवार्ड शोमध्ये दोघांनीही एकत्र एन्ट्री घेऊन आपल्या नात्यावर जणू शिक्कामोर्तब केले.  अगदी या महिन्याच्या सुरूवातील विग्नेश व नयनतारा दोघेही अमेरिकेत एकत्र सुट्टी एन्जॉय करताना दिसले होते. विग्नेश नयनताराला प्रेमाने थनगमेय बोलवतो. 
विग्नेशआधी प्रभुदेवासोबत नयनतारा रिलेशनशिपमध्ये होती. नयनताराने प्रभुदेवाला ‘उद्धस्त’ केले, असे म्हटले जाते.  २००८ पासून प्रभुदेवा व नयनतारा एकमेकांना डेटींग करत होते. पण प्रभुदेवाची पत्नी कोर्टात गेली तेव्हा नयनताराने असे काही नसल्याचे अगदी शिरजोरपणे सांगितले होते. एकीकडे माझ्यात व प्रभुदेवात काहीही नसल्याचे नयनतारा सांगत होती तर दुसरीकडे प्रभुदेवा नयनताराच्या प्रेमात आकंठ बुडाला होता. नयनतारानेही प्रभुदेवासोबत लग्न करण्यासाठी हिंदू धर्मही स्विकारला होता. ती आधी ख्रिश्चन होती. २०११मध्ये प्रभुदेवाने नयनतारासाठी पत्नीला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला. पत्नीसोबतचे १६ वर्षांचे नाते त्याने तोडले. यापोटी प्रभुदेवाला   १० लाख रुपये, शिवाय २० ते २५ कोटींची प्रॉपर्टी शिवाय दोन कार असे सगळे पत्नीला द्यावे लागले. यामुळे नयनताराचे प्रेम आपल्याला मिळेल, असा प्रभुदेवाचा अंदाज होता. पण त्याचा हा अंदाज फसला. जिच्याशी लग्न करण्यासाठी प्रभुदेवाने पत्नीला सोडले त्या नयनताराने २०१२ मध्ये प्रभुदेवासोबतचे नाते संपल्याचे जाहीर केले. तेव्हापासून प्रभुदेवा एकटा आहे. 

ALSO READ : नयनतारा नावाच्या वादळाने ‘उद्धवस्त’ केले प्रभुदेवाचे आयुष्य!!
Web Title: So, what Nayanakar did with Vignesh Shiva?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.