... so that the song 'Kante Naaatate Din Yehaar' was seen in the hot episode Sridevi! | ...तर यामुळे ‘कांटे नहीं कटते दिन ये रात’ या गाण्यात हॉट अंदाजात दिसली श्रीदेवी!

१९७८ मध्ये आलेला ‘मिस्टर इंडिया’ हा चित्रपट तर तुम्हाला आठवत असेलच. या चित्रपटातील एका गाण्यात अभिनेत्री श्रीदेवीचा अतिशय बोल्ड आणि सेक्सी अवतार बघावयास मिळाला. ‘कांटे नहीं कटते दिन ये रात’ असे बोेल असलेल्या या गाण्यात श्रीदेवीने अक्षरश: आग लावली होती. मात्र तुम्हाला माहिती आहे काय की, श्रीदेवीला या गाण्यात सेक्सी लूकमध्ये दाखविण्यात नेमका कोणाचा हात होता? होय, श्रीदेवीला अशा बोल्ड अंदाजात दाखविण्यासाठी बोनी कपूर यांनी त्यावेळी मोठी फिल्डिंग लावली होती. कारण बोनी कपूर यांनी त्यावेळी त्यांच्या टीमला चॅलेंज केले होते की, ते श्रीदेवीला जास्तीत जास्त सेक्सी अवतारात दाखविणार आहेत. 

मात्र त्यावेळी श्रीदेवीला प्रचंड ताप होता. अशात बोनी कपूरने दिलेले चॅलेंज त्यांना मागे घ्यावे लागेल अशीच त्यांच्या टीममध्ये चर्चा होती. परंतु सहजासहजी माघार घेणार ते बोनी कपूर कसले. त्यांनी श्रीदेवीला तयार केले. श्रीदेवीनेदेखील गाणे शूट करण्यासाठी उत्साह दाखविला. या गाण्याला अधिकाधिक परफेक्ट बनविण्यासाठी टीमने श्रीदेवीवर नवनवे प्रयोगही केले. निळ्या रंगाच्या साडीत भिजलेल्या श्रीदेवीच्या शरीराने अक्षरश: कहर केला होता. खरं तर हा संपूर्ण चित्रपट मुलांवर आधारित होता, परंतु हे गाणे बघून तरुणांचेही हृदय धडधड करायला लागले. या गाण्यातील श्रीदेवीचा अंदाज प्रेक्षकांना खूपच भावला होता. बोनी कपूरही त्यांच्या टीमवर खूप इम्प्रेस झाले होते. वास्तविक गाण्यात श्रीदेवी अनिल कपूरबरोबर रोमान्स करताना दिसत होती. परंतु तिचे हृदय बोनी कपूरसाठी धडकत होते. कारण याच चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान बोनी कपूर आणि तिच्यात प्रेमांकुर फुलले. विशेष म्हणजे त्यावेळी बोनी कपूर विवाहित होते. पत्नी मोना कपूरसोबत ते राहत होते. विशेष म्हणजे मोना आणि श्रीदेवी खूप चांगल्या मैत्रिणी होत्या. याच कारणामुळे श्रीदेवी नेहमी बोनी यांच्या घरी येत जात होती. पुढे या दोघांच्या प्रेमाची बातमी समोर आली. त्यानंतर श्रीदेवी आणि बोनी यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आज दोघेही त्यांच्या वैवाहिक जीवनात आनंदी आहेत. 
Web Title: ... so that the song 'Kante Naaatate Din Yehaar' was seen in the hot episode Sridevi!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.