SO SAD! Kapil Sharma's 'One' wish was finally finished ... !! | SO SAD! ​कपिल शर्माची ‘ही’ एक इच्छा अखेर राहिली अपूर्ण...!!

कपिल शर्मा काही दिवसांपूर्वी चांगलाच वादात सापडला होता. एका पाठोपाठ एक अशा अनेक वादांची त्याची पिच्छा पुरवला होता. पण कपिलने प्रयत्नपूर्वक या वादांपासून गाठ सोडवून घेतली. सध्या कपिल त्याच्या ‘फिरंगी’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. ‘फिरंगी’मध्ये कपिलने अनेक एक्ससाईटींग गोष्टी केल्या आहेत. त्यामुळेच हा चित्रपट त्याच्या अतिशय जवळचा आहे.

आत्तापर्यंत आलेल्या अनेक चित्रपटांत आपण पंजाबमधील निसर्गसौंदर्य पाहिले. पण पंजाबची पार्श्वभूमी असलेल्या कुठल्याही चित्रपटात आपण डोंगर, टेकड्या पाहिल्या नाहीत. हिमाचल व पंजाबचे विभाजन होण्याआधी पंजाबात डोंगर होते. कपिलच्या चित्रपटात पंजाबतील या डोंगर-द-या दिसणार आहेत. कपिलने या चित्रपटासाठी एका संपूर्ण गावाला पीरियड लूक दिला होता. हा सेट न तोडता, येथे गाव वसवावे, अशी कपिलची मनापासून इच्छा होती. हा सेट उभारण्यासाठी बरीच मेहनत करण्यात आली होती. पीरियड प्रॉप्स शोधण्यासाठी टीमने अनेक कष्ट घेतले होते. त्या काळातला वीजेच्या खांबासारख्या गोष्टी शोधण्यासाठी कपिलच्या टीमने जंग जंग पछाडले होते. त्यामुळेच हा सेट कायम राहावा, असे कपिलला वाटत होते. त्याने यासंदर्भात राज्य सरकारशी चर्चाही केली होती. पण या मार्गात अनेक तांत्रिक अडचणी होत्या. अखेर कपिलला आपला हा इरादा सोडून द्यावा लागला.

ALSO READ: ​‘त्या’ दिवशी कपिल शर्माने केला होता आत्महत्येचा विचार!

‘फिरंगी’ हा कपिलचा दुसरा चित्रपट आहे. याआधी २०१५ मध्ये कपिलचा ‘किस किस को प्यार करूं’ हा चित्रपट रिलीज झाला होता. आता कपिल ‘फिरंगी’ घेऊन येतो आहे. हा चित्रपट कपिलने स्वत: प्रोड्यूस केलेला आहे. सूत्रांच्या मते, यात प्रेमाचा एक कोणही आहे. कपिल शर्मा एका देशी मुलीच्या प्रेमात पडतो. पण ही मुलगी पुढे इंग्रजी भाषेच्या प्रेमात पडते. आपले प्रेम मिळवण्याच्या नादात कपिल इंग्रजी राजवटीविरोधात मैदानात उतरतो, असे या चित्रपटाचे कथानक असल्याचे कळतेय. या चित्रपटात दोन नायिका आहेत. एक तनुश्री दत्ताची बहीण इशिता दत्ता आणि दुसरी मोनिका गिल. दोघीही लीड भूमिकेत आहे. कपिलचा ‘जिगरी यार’ राजीव धिंगरा या चित्रपटाचे दिग्दर्शन करतो आहे. आत्तापर्यंत राजीवने ‘लव पंजाब’ आणि ‘अंग्रेज’ हे दोन हिट सिनेमे दिले आहेत.
Web Title: SO SAD! Kapil Sharma's 'One' wish was finally finished ... !!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.