'Smoking Hot', 'Ramcom' Bichrechra Trailer! | ‘स्मोकिंग हॉट’, ‘रॉमकॉम’ बेफिक्रे ट्रेलर!

‘किसिंग सीन्स’ मुळे चर्चेत असलेल्या ‘बेफिक्रे ’ चित्रपटाचा ट्रेलर अखेर आऊट झाला. चित्रपटात रणवीर सिंग आणि वाणी कपूर यांची हॉट केमिस्ट्री चाहत्यांना आश्चर्यचकित करणारी असेल. चित्रपटातील किसिंग सीन्स हे चित्रपटाचे विशेष म्हणता येईल. तसेच दिग्दर्शक आदित्य चोप्रा हा या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करतोय.

‘रब ने बना दी जोडी’, ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेगे’, ‘दिल तो पागल हैं’, ‘वीर झारा’ आणि ‘जब तक हैं जान’ या चित्रपटांमध्ये आदित्य चोप्राने शाहरुख खानची निवड केली होती आणि आता त्याने रणवीर सिंगची निवड केली, ही एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे.

आदित्य चोप्राला शाहरुखपेक्षा सरस असा रणवीर सिंग अभिनेता म्हणून मिळालाय असे वाटतेय. रणवीर आणि वाणी या चित्रपटात एकत्र काम करताना दिसत आहेत. ‘सेक्स आणि फ्लर्टिंग’ या विषयानुसार चित्रपटाचे कथानक असून गाणीही विशाल शेखर यांनी संगीतबद्ध केली आहेत.

">http://
Web Title: 'Smoking Hot', 'Ramcom' Bichrechra Trailer!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.