Singer Palak Mukhhal's mother abused in Taj Mahotsa! Strike on stage! | ​ताज महोत्सवात सिंगर पलक मुछालच्या आईसोबत गैरवर्तन ! मंचावर हाणामारी !!

‘सनम रे’,‘प्रेम रतन धन पायो’ अशा शानदार चित्रपटांत शानदार गाणी गाणारी ्बॉलिवूडची पार्श्वगायिका पलक मुछाल हिच्या आईसोबत आग-यातील ताज महोत्सवाच्या मंचावर गैरवर्तन करण्यात आल्याचे समोर आले आहे.  पुढे हे प्रकरण  आयोजक व पलकचा भाऊ पलाश यांच्यातील हाणामारीपर्यंत वाढले. यानंतर पलक लाईव्ह शो अर्धवट सोडून निघून गेली.
 
उत्तर प्रदेशातील आग्रा येथे  ताज महोत्सवाच्या मंचावर  मंगळवारी ही घटना घडली. पलकचा लाईव्ह शो ऐन रंगात आला असताना आयोजक समितीचे सांस्कृतिक संयोजक व गझल गायक सुधीर नारायण यांनी पलकला होळीचे गाणे गाण्याची गळ घातली. सूत्रांच्या मते, पलकच्या आईने याला विरोध केला आणि यावरून त्यांच्यात व सुधीर नारायण यांच्यात जुंपली. यानंतर पलकचा भाऊ पलाश याने या वादात उडी घेतली. काहीच क्षणात हा वाद हाणामारीपर्यंत गेला. जिल्हा प्रशासनाने ऐनकेन प्रकारे दोघांनाही आवरले. पण तोपर्यंत पलक मंचावरून खाली उतरली होती. आपण गाणार नाही, हे तिने जाहीर करून टाकले. आयोजकांनी तिला रोखण्याचे बरेच प्रयत्न केलेत. पण संतापलेली पलक कुणाचेही न ऐकता शो मध्येच सोडून निघून गेली. या घटनेनंतर आयोजकांना कार्यक्रम आवरता घ्यावा लागला.
पलक मुछाल भाऊ पलाश मुछालसोबत  भारतभर संगीताचे कार्यक्रम प्रस्तुत करते व त्यामधून मिळणारी रक्कम आर्थिक आधाराची गरज असलेल्या गरीब व हृदयविकाराचा आजार असलेल्या मुलांच्या इलाजावर खर्च करते. मे २०१३ पर्यंत तिच्या मुछाल हार्ट फाऊंडेशनने अडीच कोटींची रक्कम गोळा करत, ५७२ मुलांचा जीव वाचवला आहे. पलकच्या या समाजकार्यातील योगदानासाठी तिचे नाव गिनीज बुक आॅफ रेकॉर्ड्स आणि लिम्का बुक आॅफ रेकॉर्ड्समध्ये नोंदवले गेले आहे
२०११ मध्ये तिने हिंदी चित्रपटसृष्टीत पार्श्वगायिका म्हणून करिअर सुरू केले.  ‘एक था टायगर’, ‘आशिकी २’, ‘प्रेम रतन धन पायो’ इत्यादी अनेक चित्रपटांसाठी गाणी गायली आहेत.

 
Web Title: Singer Palak Mukhhal's mother abused in Taj Mahotsa! Strike on stage!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.