Singer Kailash Kher's wife twice tried suicide; If the reads will be shocked! | गायक कैलाश खेरच्या पत्नीने दोनदा केला आत्महत्येचा प्रयत्न; कारण वाचाल तर धक्का बसेल!

बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक कैलाश खेरची पत्नी शीतल भान कधीकाळी आयुष्याला वैतागून आत्महत्या करू इच्छित होती. परंतु शीतल भानमधील संघर्षशील प्रवृत्तीने तिला असे करण्यासाठी रोखले. तिला मृत्यूऐवजी जगण्याचा मार्ग सापडला. शीतल भान पेशाने लेखिका असून, मुंबईमध्येच राहाते. आठ वर्षांपूर्वी त्यांचा कैलाश खेरसोबत विवाह झाला. शीतल भानने हिंदुस्तान टाइम्सला आपल्या आयुष्याचे अनुभव सांगतांना तिने आत्महत्या करण्याबाबतचा उलगडा केला. 

शीतलने म्हटले की, ‘जेव्हा मी पंधरा वर्षांची होती, तेव्हा माझे लैंगिक शोषण झाले होते. ही माझ्या आयुष्यातील सर्वात भीतीदायक घटना आहे.’ शीतलने असे सांगितले की, ‘माझ्यासोबत लहानपणीच ही घटना घडली. दुर्दैवाने माझ्या परिवारात याविषयी चर्चा करण्याची परंपरा नाही. त्यामुळे मी यादरम्यान अशा वेदना सहन केल्या ज्यामुळे माझ्या मनात आत्महत्या करण्याचा विचार येत होता.  पुढे बोलताना शीतलने सांगितले की, ‘बºयाचदा असे करणारे लोक आपल्या ओळखीचेच असतात. परंतु त्यांचा आपण कसा सामना करतो हे महत्त्वाचे असते. दुर्दैवाने आमच्या परिवारात याविषयी बोलण्याचा कोणालाही अधिकार नाही. खरं तर जेव्हा असे कोणाबरोबरही घडते तेव्हा त्याचे काउंसलिंग करणे गरजेचे असते. परंतु माझ्याबाबतीत तसे घडले नाही.आपले भयानक अनुभव सांगताना शीतलने म्हटले की, मी एकदा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दुसºयांदा जेव्हा मी असा प्रयत्न केला तेव्हा मला असे वाटले की, आपण स्वत:लाच या वेदना देत आहोत. मात्र माझे दु:ख कोणाजवळ व्यक्त करू, हे मला समजेनासे झाल्यानेच मी या निर्णयापर्यंत पोहोचली होती. यावेळी शीतलने लोकांना अपील करताना म्हटले की, तुमच्या मुलांवर नेहमीच लक्ष ठेवा. त्यांच्या सवयी, त्यांच्यातील हावभाव समजून त्यांचे काउंसलिंग करण्याचा प्रयत्न करा. 

Web Title: Singer Kailash Kher's wife twice tried suicide; If the reads will be shocked!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.