Simmba actor Sonu Sood pens an emotional letter for his parents after the film’s success | तुमच्याशिवाय सगळचं अपूर्ण...! सोनू सूद झाला भावूक!!
तुमच्याशिवाय सगळचं अपूर्ण...! सोनू सूद झाला भावूक!!

ठळक मुद्देसुमारे दोन आठवड्यांपूर्वी रिलीज झालेल्या ‘सिम्बा’ची जादू कायम आहे. बॉक्स आॅफिसवर या चित्रपटाने धूम केली आहे. केवळ दोन आठवड्यांत ‘सिम्बा’ने २०० कोटी रूपयांची कमाई केली आहे.

सुमारे दोन आठवड्यांपूर्वी रिलीज झालेल्या ‘सिम्बा’ची जादू कायम आहे. बॉक्स आॅफिसवर या चित्रपटाने धूम केली आहे. केवळ दोन आठवड्यांत ‘सिम्बा’ने २०० कोटी रूपयांची कमाई केली आहे. साहजिकचं ‘सिम्बा’ची अख्खी टीम सध्या जाम आनंदात आहे. या आनंदात अलीकडेच ‘सिम्बा’च्या स्टारकास्टने धम्माल पार्टीही केली. या चित्रपटात रणवीर सिंगने संग्राम भालेराव नामक पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. रणवीरने आपल्या अदाकारीने चित्रपटात जणू जीव ओतला. तर विलेनच्या भूमिकेतील सोनू सूद हाही तितकाच भाव खाऊन गेला. सोनूने या चित्रपटात यशवंत रानडे नामक पात्र साकारले आहे. तूर्तास सोनू सूद आपल्या एका पत्रामुळे चर्चा आहे. होय, काही तासांपूर्वी सोनूने आपल्या सोशल अकाऊंटवर एक भावूक पत्र शेअर केले आहे. हे पत्र सोनूने आपल्या मातापित्याला उद्देशून लिहिले आहे.

तो लिहितो, आज जेव्हा अनेक लोकांनी माझ्या नव्या चित्रपटाच्या यशाबद्दल मला शुभेच्छा देण्यासाठी फोन केलेत, तेव्हा एक फोन मी प्रचंड मिस केला. तो कॉल तुम्हा दोघांना होता. माझ्या लहान मोठ्या यशानंतर प्रत्येकवेळी तुमचा कॉल मला यायचा. आज तुमच्याशिवाय सगळे काही अधुरे आहे. तुमच्यासोबत थिएटरमध्ये बसून मी चित्रपट पाहू शकलो असतो तर...संघर्षाच्या काळात मी तुमच्यापासून दूर राहिलो. पण लोकांच्या टाळ्या आणि शिट्या सगळे काही सांगतात...
सोनूने आणखीही बरेच काही लिहिले आहे. त्याचे संपूर्ण पत्र आम्ही सोबत देत आहोत. 


Web Title: Simmba actor Sonu Sood pens an emotional letter for his parents after the film’s success
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.