Siddharth Malhotra's 'Bugti Boat' to save Begum Khan? | ‘बेगम खान’ वाचवणार का सिद्धार्थ मल्होत्राची ‘बुडती नौका’?

करिना कपूरच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, करिना लवकरच करण जोहरच्या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात करिना सिद्धार्थ मल्होत्रासोबत आॅनस्क्रीन रोमान्स करताना दिसणार आहे.  
सध्या रिया कपूरचा आगामी चित्रपट ‘वीरे दी वेडिंग’मध्ये करिना बिझी आहे. आई झाल्यानंतरचा करिनाचा हा पहिला चित्रपट असणार आहे. म्हणजेच एकप्रकारे करिनाचा हा ‘कमबॅक’ सिनेमा आहे. या चित्रपटानंतर करिना करण जोहरच्या चित्रपटात झळकणार आहे. खबर खरी मानाल तर, हा चित्रपट ‘धडक’चे सहाय्यक दिग्दर्शक राज मेहता दिग्दर्शित करणार आहे. या चित्रपटासाठी करिना व सिद्धार्थला साईन करण्यात आले आहे. केवळ इतकेच नाही तर या चित्रपटासाठी करणला आणखी एक जोडी हवी आहे. कालचं करिना धर्मा प्रॉडक्शनच्या आॅफिसबाहेर दिसली होती. त्यामुळे करिनाने करणचा चित्रपट साईन केल्याचे मानले जात आहे. तूर्तास या चित्रपटाचे नाव समोर आले नाही. पण या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे.ALSO READ : अभिनेत्री नीतू चंद्रा संतापली...सिद्धार्थ मल्होत्राला मागावी लागली माफी! वाचा संपूर्ण प्रकरण!!

करणच्या या चित्रपटाबद्दल करिना उत्सूक असणारचं. पण तिच्यापेक्षाही सिद्धार्थ मल्होत्रा या चित्रपटासाठी अधिक उत्सूक असल्याचे कळतेय. आता का? तर करिनासोबतच्या या चित्रपटाच्या रूपात स्वत:ची बुडती नौका वाचवण्याची आणखी एक संधी सिद्धार्थला मिळणार आहे. ‘अ जेंटलमॅन’, ‘बार बार देखो’,‘इत्तेफाक’,‘अय्यारी’ असे एकापाठोपाठ एक येणारे सगळेच चित्रपट धडाधड आपल्याने सिद्धार्थला सध्या एका हिटची गरज आहे. करणच्याच ‘स्टुडंट आॅफ इ ईअर’मधून सिद्धार्थने बॉलिवूड डेब्यू केला होता. या चित्रपटानंतर सिद्धार्थला चित्रपट मिळाले खरे. पण बॉक्सआॅफिसवर त्याचा एकही चित्रपट कमाल दाखवू शकला नाही. आता तर सिद्धार्थचे करिअर बुडते की काय, अशी शंका वाटू लागलीय. आपले हे बुडते करिअर वाचवायचे तर सिद्धार्थला आधार हवा आहे. करिना यात सिद्धार्थला किती मदतगार ठरते, ते बघूयात.
Web Title: Siddharth Malhotra's 'Bugti Boat' to save Begum Khan?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.