Shraddha kapoor quit saina nehwal biopic and now parineeti chopra will play her role | म्हणून श्रद्धा आऊट होऊन परिणीती चोप्रा झाली सायनच्या बायोपिकमध्ये इन
म्हणून श्रद्धा आऊट होऊन परिणीती चोप्रा झाली सायनच्या बायोपिकमध्ये इन

ठळक मुद्दे श्रद्धाला सायनाचे बॅडमिंटन स्किल जमत नव्हतेसायना ही श्रद्धाच्या परफॉर्मन्सवर फारशी खुश नसल्याची माहिती आहे

सध्या बॉलिवूडमध्ये बायोपिकचा ट्रेंड सुरु आहे. या लिस्टमध्ये सायना नेहवालच्या बायोपिकची देखील गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे. काही महिन्यांपूर्वी निर्मात्यांनी या सिनेमातील श्रद्धा कपूरचा फर्स्ट लूकसुद्धा आऊट केला होता. लवकरच या सिनेमाची शूटिंग सुरु होणार अशी माहिती होती. मात्र आता या सिनेमाशू संबंधीत एक वेगळीच माहिती समोर येतेय.   


सायना नेहवालच्या बायोपिकमधून श्रद्धा कपूर आऊट झाली आहे. हो, तुम्ही बरोबर वाचलात श्रद्धाने स्वत:हुने या सिनेमातून माघार घेतली आहे. श्रद्धाच्या बिझी शेड्यूलमुळे तिला हा सिनेमा सोडायला लागल्याचे कळतेय.सिनेमाचे निर्माते भूषण कुमार यांनी या बातमीला दुजोरा देत म्हणाले, आम्हाला याच वर्षी सायना नेहवालाच्या बायोपिकचे शूटिंग पूर्ण करायचे आहे कारण 2020 मध्ये हा सिनेमा रिलीज होणार आहे. त्यामुळे श्रद्धा आणि आम्ही परस्पर संमतीने हा निर्णय घेतला. श्रद्धा आऊट होताच या सिनेमात परिणीती चोप्राची एंट्री झाली.

आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार श्रद्धाला सायनाचे बॅडमिंटन स्किल जमत नव्हते. त्यामुळे अनेक शूटिंगच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. सायना ही श्रद्धाच्या परफॉर्मन्सवर फारशी खुश नसल्याची माहिती आहे. त्यामुळे अखेर श्रद्धाने हा सिनेमा सोडला असेल अशी शंका व्यक्त करण्यात येते आहे. श्रद्धानंतर परिणीतीदेखील  बॅडमिंटनचे ट्रेनिंग घेणार आहे. त्यामुळे तिले हे सगळं कितपत जमते हे आपल्याला लवकरच कळेल.  


Web Title: Shraddha kapoor quit saina nehwal biopic and now parineeti chopra will play her role
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.