Shraddha Kapoor performing pink cold in Uttarakhand | उत्तराखंडमध्ये गुलाबी ठंडी एन्जॉय करतेय श्रद्धा कपूर

शाहिद कपूर आणि श्रद्धा कपूर यांची जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करायला तयार आहे. दोघे ही श्री नारायण सिंग यांचा चित्रपट बत्ती गुल मीटर चालू चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. शाहिदने काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाची शूटिंग सुरु केली आहे. आता त्याला श्रद्धा कपूरने सुद्धा ज्वाईन केले आहे. या गोष्टीची माहिती श्रद्धाने ट्विटरवरुन दिली आहे. श्रद्धा यात एका वकिलाची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात काम करण्यासाठी ती खूपच उत्सुक आहे.       

श्रद्धाने ट्वीट करत लिहिले आहे, 'बत्ती गुल मीटर चालू'चा पहिला दिवस. या प्रवासाची सुरुवात करून मी खूपच उत्साहित आहे. शाहिद कपूरला सेटवर भेटूया. मला शुभेच्छा द्या.  
याआधी श्री नारायण सिंग यानी अक्षय कुमाराच्या ‘टॉयलेट एक प्रेम कथा’ सारखा सामाजिक विषयावर चित्रपट तयार केला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 100 कोटींचा गल्ला जमावला आहे. हा एक सोशल कॉमेडी चित्रपट आहे. यात श्रद्धासोबत शाहिद आणि यामीचीदेखील महत्त्वाची भूमिका आहे. चित्रपटाचे पहिले शूटिंगचे शेड्यूल टिहरीमध्ये होणार आहे. यानंतर मसूरी आणि ऋषिकेशलासुद्धा शूटिंग केले जाणार आहे. यात शाहिद एका वकिलाची भूमिकेत दिसणार आहे जो वीज कंपनीच्या विरोधात लढत असतो. या भूमितेसाठी शाहिद गढवाली भाषा शिकतो आहे. तर यामी गौतम हिंदी साहित्याचा अभ्यास करते आहे. 
 
शाहिद पद्मावतमध्ये साकारलेली राजा रावल रतन सिंगची भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडली होती. त्यामुळे आता शाहिदची वकिलाची भूमिका प्रेक्षकांना कितपत भावते हे चित्रपट रिलीज झाल्यावर आपल्याला कळेलच. शाहिदला या चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत. 

श्रद्धा कपूर लवकरच 'स्त्री' चित्रपटातून राजकुमार रावसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. 'स्त्री' हा हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन अमर कौशिक करणार आहे. या चित्रपटाचे लेखन राज आणि डिकेने केले आहे. चित्रपटाची निर्मिती डिनेश विजन, राज आणि डीके करणार आहेत.  
   
Web Title: Shraddha Kapoor performing pink cold in Uttarakhand
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.