Shraddha Kapoor arrived in Hyderabad for shooting Saho, but a new person appeared with her at this time | 'साहो'च्या चित्रीकरणासाठी हैदराबादमध्ये पोहचली श्रद्धा कपूर, मात्र यावेळी तिच्यासोबत दिसला नवा व्यक्ती
'साहो'च्या चित्रीकरणासाठी हैदराबादमध्ये पोहचली श्रद्धा कपूर, मात्र यावेळी तिच्यासोबत दिसला नवा व्यक्ती

ठळक मुद्देश्रद्धा सध्या करतेय हैदराबादमध्ये चित्रीकरणश्रद्धा साहोमध्ये दिसणार प्रभाससोबत

श्रद्धा कपूर आपल्या आगामी बिग बजेट चित्रपट 'साहो'मधील अॅक्शन सीक्वन्सच्या चित्रीकरणासाठी हैदराबादला रवाना झाली आहे. यावेळी श्रद्धा एकटीच हैदराबादला गेली नसून तिच्यासोबत ती एक व्यक्ती घेऊन गेली आहे. हा व्यक्ती कोरियोग्राफर असून तो श्रद्धासोबत साहोच्या चित्रीकरणावेळी असणार आहे. नुकतेच नवीन डान्सवर आधारीत चित्रपटाची घोषणा करण्यात आली. या चित्रपटाच्या माध्यमातून श्रद्धा कपूर पुन्हा एकदा 'एबीसीडी' टीमसोबत काम करणार आहे.


श्रद्धा कपूरने रेमो डिसुझाच्या डान्स चित्रपटात पाऊल टाकले तेव्हापासून ती या चित्रपटाच्या तयारीला लागली आहे आणि या चित्रपटाच्या तयारीसाठी श्रद्धा आपल्यासोबत कोरियोग्राफरला घेऊन जात आहे. साहोच्या शूटिंगच्या आधी व पॅकअपनंतर डान्सचे प्रशिक्षण घेऊ शकेल. श्रद्धा कपूरने रुपेरी पडद्यावर केलेल्या डान्ससाठी प्रेक्षकांची वाहवा मिळवलेली आहे.

सुन साथिया, छम छम, हाय रेटेड गबरू हे श्रद्धाची गाजलेली गाणी आहेत. तिने या गाण्यावर केलेला डान्स प्रेक्षकांना खूप भावला आहे आणि पुन्हा एकदा आपल्या चाहत्यांचे मन डान्समधून जिंकण्यासाठी ती कठोर परीश्रम करत आहे.

'स्त्री' चित्रपटाच्या यशानंतर श्रद्धा 'साहो', 'छिछोर', सायना नेहवाल बायोपिक व 'एबीसीडी'चा आगामी भागात दिसणार आहे.


Web Title: Shraddha Kapoor arrived in Hyderabad for shooting Saho, but a new person appeared with her at this time
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.