Shooting for your biopic soon to launch Sunny Leone | लवकरच सनी लिओनी सुरु करणार आपल्या बायोपिकची शूटिंग

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी सध्या चर्चेत आहे. या चर्चेचा विषय आहे सनी लिओनीचा बायोपिक 'करणजीत कौर- द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लिओनी'. या बायोपिकच्या शूटिंगसाठी सनी लिओनी दक्षिण आफ्रिकेला जाणार आहे.  

सनी मीडियाशी बोलताना सांगितले होते की, या वर्षी माझे शेड्यूल खूप व्यस्त आहे आणि मला ते तसेच हवे होते. हे वर्ष माझ्यासाठी खूप चांगले आहे. मी माझ्यासाठी बायोपिकच्या शूटिंगसाठी दक्षिण आफ्रिकेला जातेय आणि मी माझ्या टीमला भेटण्यासाठी खूपच उत्साही आहे. 'करणजीत कौर- द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लिओनी' या शोचे प्रसारण  झी ५ या नव्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म होणार आहे. यात सनीचा करणजीत कौर ते सनी होण्यापर्यंतचा प्रवास दाखवण्यात येणार आहे. 

काही दिवसांपूर्वी सरोगसीने जुळ्या मुलांची आई झाल्याची बातमी सनीने सोशल मीडियावरून दिली. सनी बिग बॉसच्या घरात प्रवेश करण्यासाठी भारतात आली होती.  बिग बॉसमुळे तिला अनेक चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. महेश भट्ट यांच्या 'जिस्म २' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर शुटआऊट अॅट वडाळा, रागिनी एमएमएस २, हेट स्टोरी २, सिंग इज ब्लिंग यांसारख्या चित्रपटात तिने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. मात्र सनीला खरी ओळख मिळाली होती आयटम गर्ल म्हणूनच.  सनी लियोनीवर चित्रीत करण्यात आलेले बेबी डॉल साँग तर खूपच गाजले होते. 

ALSO READ :  सनी लिओनीने आपल्या चिमुकलीला कवेत लपवित केला कठुआ घटनेचा निषेध!

सनीचे खरे नाव हे करणजीत कौर वोहरा असून ती एक पंजाबी आहे. तिला लहानपणापासूनच बॉलिवूडचे चित्रपट पाहायला खूप आवडतात. आमिर खान हा तिचा आवडता अभिनेता असून त्याचा दिल हा चित्रपट पाहिल्यावर ती त्याच्यावर फिदा झाली होती. आज सनी ही तिच्या गाण्यांसाठी, नृत्यांसाठी ओळखली जाते. पण सनीने जेव्हा बॉलिवूडमध्ये पदार्पण केले, तेव्हा वेगवेगळ्या स्तरातून विचित्र प्रतिक्रिया उमटल्या गेल्या होत्या. पॉर्नस्टार बॉलिवूडची अभिनेत्री कशी काय बनू शकते असे त्यावेळी अनेकांचे म्हणणे होते. तसेच तरुण पिढीला बिघडवण्याचे खापर तिच्या माथी फोडले गेले, पण तरीही ती डगमगली नाही आणि मेहनत, कष्ट करून ती बॉलिवूडमध्ये चांगलीच रुळली. 
Web Title: Shooting for your biopic soon to launch Sunny Leone
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.