Shooting of Salman Khan's India film from 'This' will be done | 'या' शहरातून होणार सलमान खानच्या भारत चित्रपटाची शूटिंग

सलमान खान नुकतीच 'रेस3' चित्रपटाची शूटिंग लेह-लद्दाखमध्ये पूर्ण करुन मुंबईत परतलला आहे. यानंतर सलमान त्याचा आगामी चित्रपट भारतच्या शूटिंगमध्ये व्यस्त होणार आहे. चित्रपटाचा दिग्दर्शक अली अब्बासने काही दिवसांपूर्वीच चित्रपटाच्या स्क्रिप्टचे काम पूर्ण केले आहे आणि सध्या तो शूटिंगचे लोकेशन फायनल करतो आहे.  

दिग्दर्शक अली अब्बासने काही दिवसांपूर्वी पंजाबचे लोकेशन बघून आला होता. त्यानंतर त्यांने दिल्लीत येऊन लोकेशन फायनल केले आहे. अलीने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक फोटो पोस्ट केला आहे. याफोटोत अलीसोबत त्याची पूर्ण टीम दिसते आहे.  

 

भारतमध्ये सलमान खान 5 वेगवेगळ्या लूकमध्ये दिसणार आहे. चित्रपटात सलमान 60 वर्षांचे आयुष्य जगताना दाखवण्यात येणार आहे. 52 वर्षांचा सलमान खान ‘भारत’मध्ये 18 वर्षांचा दिसणार आहे. यासाठी खास ऐज रिडक्शन टेक्निक  वापरली जाणार आहे. म्हणजेच, ‘मैने प्यार किया’मध्ये जो सलमान आपण पाहिलात, अगदी तसा सलमान ‘भारत’मध्ये आपल्याला दिसणार आहे. या टेक्निकसंदर्भात मेकर्सनी व्हिएफएक्स टीमसोबत चर्चा केली. याच टीमने ‘फॅन’ या चित्रपटात शाहरूखसाठी काम केले होते. सलमानला वजनही कमी करावे लागणार आहे. 

ALSO READ :  RACE-3 : नव्या पोस्टरमध्ये दिसला सलमान खान-जॅकलीन फर्नांडिसचा रोमॅण्टिक अंदाज!


भारतमध्ये सलमानसोबत देसी गर्ल प्रियांका चोप्रा स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.तूर्तास प्रियांका या चित्रपटात कुठली भूमिका साकारणार, हे गुलदस्त्यात आहे. ‘भारत’साठी प्रियांकाने मानधनापोटी भली मोठी रक्कम घेतल्याचे कळतेय. सलमान आणि प्रियांकाची जोडी 2004 मध्ये रिलीज झालेल्या ‘मुझसे शादी करोगी’ या चित्रपटात एकत्र दिसले होते. रसिकांना दोघांची केमिस्ट्री आवडली देखील होती. त्यामुळे सलमान आणि प्रियांकाचे फॅन्स या चित्रपटाची नक्कीच आतुरतेने वाट पाहत असतील.  टी-सीरिज या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. 2019च्या ईदला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  
Web Title: Shooting of Salman Khan's India film from 'This' will be done
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.