Shooting of Rohit Shetty and Ranveer Singh in the film this month | रोहित शेट्टी आणि रणवीर सिंग या महिन्यात सुरु करणार चित्रपटाचे शूटिंग

जेव्हा पासून रोहित शेट्टीने रणवीर सिंगला घेऊन चित्रपट करत असल्याची घोषणा केली तेव्हापासून प्रेक्षक त्यांच्या चित्रपटाची वाट बघत आहे. अखेर बॉलिवूडचा कमर्शियल दिग्दर्शक आणि बॉलिवूडमधला सगळ्यात एनेर्जेंटिक कलाकार एकत्र चित्रपट तयार करत आहे. हा चित्रपट साऊथच्या चित्रपट टेम्परचा रिमेक असणार आहे.  हा चित्रपट साऊथ मध्ये सुपरहिट झाला होता त्यामुळे प्रेक्षकांना रोहित शेट्टी आणि रणवीर सिंगकडून फारच अपेक्षा आहेत. 

रोहित सध्या गोलमाल अगेनच्या प्रोमोशन मध्ये व्यस्त आहे. त्यांनी त्याच्या आगामी चित्रपटाबद्दल मीडियाला सांगितले की,  "मी या चित्रपटावर काम करायला डिसेंबरमध्ये सुरुवात करणार आहे. मी टेम्पर चित्रपटाचे राइट्स विकत घेतले असून हा चित्रपट टेम्परचा ऑफिशियल रिमेकअसेल आणि या चित्रपटाचे शूटिंग पुढीच्या वर्षी म्हणजेच मे मध्ये सुरू करणार आहे.''

मीडियामध्ये अशी बातमी आहे की ह्या चित्रपटात रणवीर बरोबर कॅटरीना कैफ दिसू शकते. यावर रोहितला विचारले असता तो म्हणाला की, ''अजून या चित्रपटासाठी कोणी ही फायनल झाले नाही.  डिसेंबरपर्यंत आपल्याला या चित्रपटाच्या अभिनेत्रीबाबत जी माहिती मिळेल ती चुकीची असेल. कारण डिसेंबरमध्ये या चित्रपटाचा फायनल ड्राफ्ट बनेल तेव्हाच सगळे ठरवले जाईल.''

ALSO READ : Watch : ​केवळ अप्रतिम! चुकूनही पाहायला विसरू नये, असा ‘पद्मावती’चा शानदार ट्रेलर रिलीज!!

रणवीर सिंगबद्दल रोहित शेट्टी म्हणतो की, ''रणवीरमध्ये भरपूर एनर्जी आहे त्याचा अंदाज सगळ्यांनाच भावतो. त्याच्याबद्दल सगळेच जण चर्चा करत असतात आम्ही जो चित्रपट एकत्र करत आहोत.  तो एक अॅक्शन चित्रपट आहे आणि या भूमिकेसाठी रणवीर योग्य आहे. तो या भूमिकेला योग्य तो न्याय देईल असे मला वाटते.''
सध्या रणवीर त्याच्या पद्मावतीमधल्या लूकला घेऊन चर्चेत आहे.  तो यात सुल्तान अलाऊद्दीन खिल्जीचा भूमिका साकारतो आहे. रणवीरच्या भूमिकेला निगेटीव्ह शेड्स आहे. दीपिका पादुकोण यात राणी पद्मावतीच्या भूमिका साकारतो आहे तर शाहिद कपूर राजा महारावल रतन सिंहच्या भूमिकेत दिसणार आहे. संजय लीला भन्साळी यांचा हा चित्रपट 1 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 
Web Title: Shooting of Rohit Shetty and Ranveer Singh in the film this month
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.