Shocking: Sonakshi Sinha's alleged shooting of 'Porn Season' during the shooting of this film! | Shocking : सोनाक्षी सिन्हाच्या ‘या’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान पोर्न सीन्स शूट केल्याचा आरोप!

दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा सध्या तिच्या आगामी ‘हॅप्पी भाग जाएगी रिटर्न्स’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. मात्र याचदरम्यान एक बातमी समोर आली आहे, ज्यामुळे सोनाक्षी सिन्हा स्टारर हा चित्रपट वादाच्या भोवºयात सापडण्याची शक्यता आहे. होय, बॅँकॉक पोलिसांनी या चित्रपटाशी संबंधित इंडी बॅँकॉक कंपनी लिमिटेड या प्रॉडक्शन कंपनीवर पोर्न सीन्स चित्रित केल्याचा आरोप लावला आहे. हा चित्रपट ‘हॅप्पी भाग जाएगी’चा सीक्वेल आहे. या चित्रपटाची शूटिंग बॅँकॉक येथे सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच सोनाक्षीने थायलॅण्ड येथील काही फोटोज् सोशल मीडियावर शेअर केले होते. द नेशनच्या रिपोर्टनुसार, गेल्या बुधवारी चित्रपटाची शूटिंग केली जात होती. तेव्हा एका महिलेला ‘एडल्ट टॉय’ आणि ‘सेक्स टॉय’सोबत बघण्यात आले. विशेष या महिलेच्याही शरीरावर कपडे नव्हते. हा संपूर्ण प्रकार एका स्थानिक महिलेने रेकॉर्ड केला. त्यानंतर ही व्हिडीओ क्लीप सोशल मीडियावर व्हायरल झाली, तर एका स्थानिक पोलीस अधिकाºयाच्या मते, ‘चित्रपटाशी संबंधित प्रॉडक्शन टीमने एक दिवस अगोदरच शूटिंगसाठी परवानगी घेतली होती. यावेळी या टीमला स्पष्टपणे आदेश देण्यात आले होते की, थायलॅण्ड टूरिझम अथॉरिटीवर कुठलाही परिणाम होणार नाही, याची काळजी घ्यावी. पोलीस अधिकारी पोल यांच्या मते, ‘हॅप्पी भाग जाएगी रिटर्न्स’ या चित्रपटाची शूटिंग सध्या थायलॅण्ड येथे होत आहे. परंतु शूटिंगस्थळी काही आक्षेपार्ह साहित्य आढळल्याने लगेचच शूटिंग थांबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर या प्रॉडक्शन कंपनीवर आदेशाचे पालन न केल्याबद्दल गुन्हाही दाखल केला आहे. दरम्यान, २०१६ मध्ये रिलीज झालेला ‘हॅप्पी भाग जाएगी’ हा चित्रपट प्रेक्षकांना चांगलाच पसंत आला होता. त्यानंतरच निर्मात्यांनी चित्रपटाचा सीक्वल बनविण्याचा विचार केला. चित्रपटात डायना पेंटीसोबत सोनाक्षी सिन्हा बघावयास मिळणार आहे. 
Web Title: Shocking: Sonakshi Sinha's alleged shooting of 'Porn Season' during the shooting of this film!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.