Shocking Revelations !! Hrithik Roshan gave such answers to Kangana Ranaut! | Shocking Revelations !! कंगना राणौतच्या आरोपांना हृतिक रोशनने अशी दिली उत्तरे!

कंगना राणौतच्या वादग्रस्त बयानानंतर हृतिक रोशनने आपले म्हणणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. काल-परवा हृतिकने एक आॅफिशिअल स्टेटमेंंट मांडून कंगनाच्या आरोपांना उत्तर दिले होते. पण यानंतर कंगना नाही पण कंगनाच्या बहीणीने हृतिकला पुन्हा एकदा आरोपीच्या पिंज-यात उभे केले. हृतिकने कथितरित्या कंगनाला पाठवलेल्या ईमेलचा स्क्रिनशॉट तिने TWITTERवर उघड केला होता. यानंतर हृतिकने अर्नब गोस्वामींच्या टीव्ही शोवर पोहचत आपली बाजू मांडणेच  योग्य समजले. माझा हा इंटरव्ह्यू कुणावर चिखलफेक करण्यासाठी नाही तर माझी बाजू मांडण्यासाठी आहे, असे त्याने म्हटले.
अर्नब यांनी हृतिक व कंगनाच्या वादातील अनेक मुद्दे सगळ्यांसमोर आणण्याचे प्रयत्न केलेत. हृतिकनेही अर्नब यांच्या प्रश्नांना धैर्याने उत्तरे दिलीत. या मुलाखतीत हृतिकने दिलेली उत्तरे आम्ही तुमच्यासमोर घेऊन आलो आहोत.* मी खूप काही सहन केले. मला शांत राहण्याचा सल्ला दिला गेला. खरे तर मी हे सगळे बोलताना अजिबात कम्फर्टेबल नाही. पण आता मला बोलावेच लागणार.
* मी सर्वप्रथम कंगनाला २००८-२००९ मध्ये ‘काईट्स’च्या शूटींगदरम्यान भेटलो होतो. आम्ही केवळ चांगले मित्र होतो. ती माझ्यामुळे प्रचंड प्रभावित होती.
* मैत्रीपेक्षा माझे तिच्यासोबत कुठलेही नाते नव्हते व नाही. ‘कृष3’च्या सेटवर माझ्या वागण्यामुळे कदाचित तिला गैरसमज झाला असावा. ती तिच्या ट्रेनिंगदरम्यान मला स्वत:चे काही व्हिडिओ पाठवायची आणि मी यानंतर तिला फिडबॅक द्यायचो.
* जॉर्डनमध्ये ‘कृष3’चे शूटींग संपल्यानंतर एक पार्टी दिली गेली. या चित्रपटानंतर मी आयुष्यात कसे पुढे जावे, असे यादरम्यान कंगनाने मला विचारले. मी प्रचंड थकलो होतो. आपण उद्या बोलू, असे मी तिला म्हणालो. यानंतर त्याच रात्री ती माझ्या रूममध्ये आली आणि तिने जोरजोरात माझ्या रूमचा दरवाजा ठोठावला. मी माझ्या अस्टिस्टंटला सांगून तिला दूर केले. सकाळी कंगनाची बहीण रंगोली माझ्याकडे आली आणि कंगनाच्या अशा वागण्याबद्दल माझी माफी मागितली. माझी व कंगनाची आमने-सामने कधीच भेट झाली नाही.
* मी पॅरिसमध्ये कंगनाला प्रपोज केल्याची बातमी माझ्या कानावर आली तेव्हा हा खोटारेपणा जगासमोर आणण्यासाठी काहीतरी करावे लागले, असा विचार मी केला.
* कंगनाच्या अनेक आरोपानंतरही तू इतक्या महिने शांत का राहिलास? असा प्रश्न हृतिकला विचारण्यात आला. यावर मी एका योग्य ठिकाणी माझी बाजू मांडायची होती, असे त्याने सांगितले.
* २५ मेला मला शिव्यांनी भरलेला एक ईमेल आला. तो हिंदीत लिहिलेला होता. यावेळी मी उत्तर दिले नाही. कारण मला वाटले, कंगनाचे अकाऊंट कुणी हॅक केले असावे. दुसºयाच दिवशी रंगोली मला मेल करून माझ्यावर तिचे अकाऊंट हॅक केल्याचा आरोप लावला.
* hroshan@email.com  हा माझा ईमेल आयडी नाहीच. याच ईमेल आयडीवरून मी कंगनासोबत बोलत असल्याचा दावा केला गेला आहे.
* कंगनाच्या वतीने तिची बहीण रंगोली मला शिव्यांनी भरलेले ईमेल का पाठवायची, हे मला समजत नव्हते. मी कंगनाचा इमोशनल रेप केल्याचा आरोपही तिने माझ्यावर केला. यानंतर माझी कंगनासोबत एक अक्षरही बोलायची इच्छा उरली नाही. कंगना एक हायप्रोफाईल व्यक्ती आहे, यामुळे मी थोडा घाबरलो नक्कीच होता. पण प्रकरण थोडे शांत झाल्यावर मी वडिलांशी बोललो. 

ALSO READ : ​इथे पाहा, हृतिक रोशनने कंगना राणौतला पाठवलेल्या ईमेलचा स्क्रिनशॉट ! रंगोली पुन्हा बरसली!!

* कंगना मला रोज १० ते १५ मेल पाठवायची. मला सवय झाली होती. मी तिला ब्लॉक केले नाही. कारण माझ्याकडे मेकबुक होते. त्यात ब्लॉकचे आॅप्शन नव्हते.
* माझ्याकडे कंगनाने पाठवलेले ३्र००० मेल आहेत. यात प्रायव्हेट फोटो व व्हिडिओ आहेत. या इतक्या मेलनंतर मी अ‍ॅक्श्न घेतली नाही कारण मी घाबरलेलो होतो. मी कंगनाचे अकाऊंट हॅक केले असते तर स्वत:ला तिचे प्रायव्हेट फोटो कसे पाठवले असते. मी कंगनासोबत कुठल्याही रिलेशनशिपमध्ये नव्हतो.
* मी रंगोलीला स्पष्ट सांगितले होते की, मला कंगनात काहीही इंटरेस्ट नाही. मी तिच्या कुठल्याही टचमध्ये नव्हतो.
- कंगना शिव्यांनी भरलेले मेल पाठवायची. धमकी द्यायची तर तू २०१६ पूर्वी तक्रार का केली नाहीस? यावर मला त्यावेळी त्याची गरज वाटली नव्हती. कारण त्यादरम्यान माझ्या आयुष्यात अनेक अडचणी होत्या आणि मला त्यात भर घालायची नव्हती. मी मजबूत नव्हतो. मी कमजोर होतो. त्यावेळी मी पूर्णपणे असहाय होतो.
* माझा व कंगनाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हा फोटो फोटोशॉप्ड असल्यसचा दावा हृतिकने केला.   खºया फोटोत माझ्या व कंगनाऐवजी सुझैन व डिनो मोरिया होते, असेही हृतिकने म्हटले.

Web Title: Shocking Revelations !! Hrithik Roshan gave such answers to Kangana Ranaut!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.