Shocking! Ranveer Singh becomes bi-sexual ... | ​Shocking! रणवीर सिंग बनला बायसेक्शुअल...

रणवीर सिंगच्या कारकिर्दीला केवळ काहीच वर्षं झाले आहेत. पण त्याचे फॅन फॉलॉव्हिंग हे प्रचंड आहे आणि त्यातही महिला चाहत्यांची संख्या ही खूप जास्त आहे. पण रणवीरच्या महिला चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी आहे. रणवीर सिंग बायसेक्शुअल बनला आहे. आता हे ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसणार आहे यात काही शंकाच नाही. पण हे खरे आहे. 
रणवीर सिंग खऱ्या आयुष्यात नाही तर त्याच्या एका चित्रपटात बायसेक्शुलची भूमिका साकारणार आहे. पद्मावती या संजय लीला भन्सालीच्या चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा आहे. या चित्रपटात दीपिका पादुकोण, शाहिद कपूर आणि रणवीर सिंग यांच्या प्रमुख भूमिका आहेत. दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांच्या बाजीराव मस्तानी या चित्रपटातील त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच आवडली होती. त्यामुळे त्या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना पुन्हा पाहायला मिळणार असे त्यांना वाटत होते. पण त्यांच्यासाठी एक वाईट बातमी आहे. या चित्रपटात राणी पद्मिनीच्या आयुष्यात असलेला अल्लाऊद्दीन खिलजी बायसेक्शुअल असल्याचे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 

Also Read : पद्मावती’बद्दल आहे एक ‘लार्जर देन लाईफ’ बातमी!!

रणवीर सिंगने त्याच्या आजवरच्या कारकिर्दीत खूप वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. आता देखील तो या भूमिकेद्वारे एक प्रयोग करणार आहे. पीपिंगमून य वेबसाईटने दिलेल्या बातमीनुसार रणवीर पद्मावती या चित्रपटात बायसेक्शुअलची भूमिका साकारत असून जिम सरभ त्याच्या जोडीदाराच्या भूमिकेत दिसणार आहे. जिमने राबता, नीरजा यांसारख्या चित्रपटात काम केले आहे. नीरजा या चित्रपटात त्याने रंगवलेला खलनायक तर प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. जिम या चित्रपटात मलिक गफूर ही भूमिका साकारत असून तो अल्लाऊद्दीनचा मार्गदर्शक असल्याचे दाखवण्यात येणार आहे. 
अल्लाऊद्दीन आणि मलिक यांच्यात असलेली प्रेमकथा संजय लीला भन्साली यांना प्रचंड आवडली होती. पण चित्रपटात यांची प्रेमकथा दाखवली जावी की नाही याबाबत ते द्विधा मनस्थितीत होते. पण आता खिलजी आणि मलिक यांच्यात काही दृश्य चित्रीत केली जाणार आहे. पण या दृश्यांमधून कोणाच्याही भावना दुखावल्या जाऊ नयेत याची काळजी संजय लीला भन्साली नक्कीच घेणार आहेत. 

Also Read : रणवीर सिंगचा 'पद्मावती' तोडणार का प्रभासच्या 'बाहुबली'चा रेकॉर्ड ?
Web Title: Shocking! Ranveer Singh becomes bi-sexual ...
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.