Shocking: Neha Dhupia accident; People took shelf help instead of selfie | Shocking : नेहा धुपियाचा अपघात; मदतीऐवजी लोकांनी काढले सेल्फी

अभिनेत्री नेहा धुपिया सध्या चित्रपटांमधून गायब असली तरी, छोट्या पडद्यावर ती सक्रिय असल्याचे दिसून येत आहे. सध्या नेहा तिच्या आगामी ‘नो फिल्टर नेहा’ या शोच्या दुसºया सीजनच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. याकरिता ती चंदिगड येथे पोहचली असता, तिच्या कारला अपघात झाला. सुदैवाने तिला या अपघातात गंभीर दुखापत झाली नाही; मात्र लोकांनी तिची मदत न करता सेल्फी घेण्याचा आनंद घेतल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. 

नेहा मुंबईची फ्लाइट पकडण्यासाठी चंदीगड विमानतळावर जात होती. मात्र मध्येच तिच्या कारला अपघात झाला. सुदैवाने या अपघातात तिला कुठल्याही प्रकारची गंभीर दुखापत झाली नाही. अपघातामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे तब्बल अर्धा तास नेहाला अपघातस्थळीच अडकून राहावे लागले. अपघाताचे कारण प्रचंड वाहतूक कोंडी असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, या अपघातात नेहाला दुखापत झाली नसल्याने तिच्या चाहत्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. मात्र अपघातामुळे नेहाला प्रचंड धक्का बसला आहे. तिला खाद्यांच्या ठिकाणी वेदना होत असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. मात्र यापेक्षा दु:खदायक म्हणजे जेव्हा नेहाचा अपघात झाला तेव्हा लोकांनी तिची मदत न करता तिच्यासोबत सेल्फी काढणे अधिक महत्त्वाचे समजले. तसेच तिचा आॅटोग्राफ घेण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. लोकांचा हा सर्व प्रकार संतापजनक असल्याने त्याचे पडसाद सोशल मीडियावर उमटत आहेत. 

दरम्यान, २०१६ मध्ये ‘नो फिल्टर नेहा’ या शोची नेहा धुपियाने पॉडकॉस्टवर सुरुवात केली होती. या शोमध्ये ती बॉलिवूड सेलिब्रिटींच्या मुलाखती घेत असते. त्यांच्या आयुष्याशी निगडीत मजेशीर किस्से उलगडण्याचा ती या शोच्या माध्यमातून प्रयत्न करीत असते. या शोला आतापर्यंत चांगला प्रतिसाद मिळाला असून, दुसºया सीजनमधूनही नेहाला अशीच काहीशी अपेक्षा आहे. 
Web Title: Shocking: Neha Dhupia accident; People took shelf help instead of selfie
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.