Shocking: Inder Kumar had already been aware of the death; Last message for 'this' ban | shocking : इंदर कुमारला अगोदर झाली होती मृत्यूची जाणीव; ‘हा’ केला अखेरचा मॅसेज!

‘मासूम’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एंट्री करणाºया अभिनेता इंदर कुमारचे (४४) गेल्या गुरुवारी (दि.२८) मुंबई स्थित फ्लॅटमध्ये निधन झाले. असे म्हटले जात आहे की, इंदरचे झोपेतच निधन झाले. पत्नी पल्लवी हिने दिलेल्या माहितीनुसार, इंदरला जेव्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले तेव्हा डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्याचबरोबर हृदयविकाराने त्याचे निधन झाल्याचेही स्पष्ट केले. परंतु निधनाच्या काही वेळ अगोदर इंदरने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेला एक मॅसेज सध्या समोर येत असल्याने त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. 

वास्तविक इंदर सोशल मीडियावर फारसा अ‍ॅक्टिव्ह नव्हता. परंतु मृत्यूच्या २४ तास अगोदर त्याने एक मॅसेज पोस्ट केला होता. इंदरने इन्स्टाग्रामवर २७ जुलै रोजी ६ वाजून २८ मिनिटांनी पोस्ट केलेल्या मॅसेजमध्ये एक फोटो शेअर केला होता. त्याचबरोबर ‘Peace’ (शांती) असे लिहिले होते. हा मॅसेज जेव्हा त्याच्या चाहत्यांनी वाचला तेव्हा त्यांना धक्काच बसला. आता तर अनेकांमध्ये अशी चर्चा रंगत आहे की, इंदरला त्याच्या मृत्यूची अगोदर जाणीव झाली होती. इंदरच्या या मॅसेजने सध्या खळबळ उडवून दिली असून, त्याच्या चाहत्यांना आश्चर्य वाटत आहे. एखाद्या निधनाच्या काहीकाळ अगोदर असा मॅसेज कसा करू शकतात, अशी चर्चाही आता सुरू झाली आहे. दरम्यान, शुक्रवारी इंदरवर अतिशय शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. ‘क्योकी सास भी कभी बहू थीं’ या लोकप्रिय मालिकेत मिहीर विरानीची भूमिका साकारून इंदर घराघरांत प्रसिद्ध झाला होता. त्याचबरोबर बॉलिवूडमध्येही त्याने वीसपेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले होते. परंतु अशातही त्याच्या अंत्यसंस्कारला एकही मोठा स्टार उपस्थित नव्हता. अयूब खान, डॉली बिंद्रा, टीना घई आणि पुनीत वशिष्ट यांच्यासह मोजकेच सेलिब्रिटी उपस्थित होते. 

दरम्यान, इंदरचा हा मॅसेज सध्या सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चिला जात असून, त्याच्या चाहत्यांना हा मॅसेज धक्कादायक ठरत आहे. इंदर हा बॉलिवूडचा दबंग सलमान खान याच्या सर्वांत क्लोज होता. वास्तविक २०१४ मध्ये जेव्हा इंदर बलात्काराच्या गुन्ह्यात अडकला होता, तेव्हापासून तो डिप्रेशनमध्ये होता. इंदरने केलेल्या या मॅसेजवरून ते स्पष्टही होते.  
Web Title: Shocking: Inder Kumar had already been aware of the death; Last message for 'this' ban
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.