Shocking: Delhi raided with Zarina Khan; Night hit in Mumbai by night | Shocking : दिल्लीत जरीन खानसोबत छेडछाड; रात्रीच फ्लाइट पकडून मुंबईत दाखल!

अभिनेत्री जरीन खान सध्या तिच्या ‘अक्सर-२’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. काही दिवसांपूर्वी जेव्हा ती प्रमोशनसाठी दिल्लीला गेली होती, तेव्हा तिला अतिशय वाईट अनुभवाचा सामना करावा लागला. त्याचे झाले असे की, जरीनला दिल्लीत ४० ते ५० लोकांनी घेरले होते. या सर्व लोकांना जरीनसोबत फोटो काढायचा होता. मात्र अचानकच परिस्थिती अनकंट्रोल झाली अन् लोकांनी एकमेकांना धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. गर्दीतील काहींनी तर जरीनसोबत छेडछाड करण्याचा प्रयत्न केला. 

जरीनशी संबंधित सूत्रांनी एका इंग्रजी वेबसाइटशी बोलताना सांगितले की, बºयाचशा प्रमोशनल इव्हेंट्समध्ये सहभागी झाल्यानंतर आम्ही अखेरच्या व्हेन्यूमध्ये केवळ १५ मिनिटांच्या इंटरेक्शनकरिता पोहोचलो होतो. आयोजकांनी अगोदरच जरीनचा बराचसा वेळ घेतला होता. पुढे चित्रपटातील इतर कास्टसोबत डिनर करताना जरीनने निर्णय घेतला की, ती लोकांसोबत संवाद साधणार. जेव्हा जरीन कार्यक्रमस्थळी निघाली तेव्हा त्याठिकाणी सुरक्षेच्यादृष्टीने पुरेशी व्यवस्था केलेली नव्हती. बघता-बघता तब्बल ४० ते ५० लोकांना तिला घेराव घातला. हे सर्व लोक जरीनसोबत फोटो क्लिक करण्याचा प्रयत्न करीत होते. पुढे तर हे प्रकरण जरीनसोबत छेडछाड करण्यापर्यंत पोहोचले. सूत्रानुसार, जेव्हा जरीनसोबत हा संपूर्ण प्रकार घडत होता, तेव्हा चित्रपटाच्या टीममधील एकही मेंबर तिच्यासोबत नव्हता. विशेष म्हणजे कोणीही तिला या परिस्थितीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला नाही. परिस्थिती एवढी हाताबाहेर गेली होती की, जरीन खूपच घाबरली होती. अखेर तिने चाहत्यांच्या मर्जीनुसार त्यांच्यासोबत फोटो काढले अन् गर्दीतून स्वत:ची सुटका केली. पुढे जरीन रात्री उशिराच फ्लाइट पकडून मुंबईला परतली. 

जरीनने एका वेबसाइटशी बोलताना म्हटले की, दिल्लीत मला ज्या कटू अनुभवाचा सामना करावा लागला तो अनुभव खूपच भीतीदायक होता. लोकांचा अशाप्रकारचा स्वभाव बघून मी प्रचंड घाबरली होती. मात्र कसेतरी मी माझे कमिटमेंट्स पूर्ण करून लोकांच्या तावडीतून स्वत:ची सुटका करून घेतली. पुढे मी रात्रीच मुंबईला परतण्याचा निर्णय घेतला. 
Web Title: Shocking: Delhi raided with Zarina Khan; Night hit in Mumbai by night
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.