अबोली कुलकर्णी

सेलिब्रिटी म्हटले की डोळयांसमोर येते ती आॅटोग्राफ आणि फोटोग्राफ घेणाऱ्या  चाहत्यांची गर्दी. कधी आपल्या लाडक्या सेलिब्रिटीचा आॅटोग्राफ आपण घेतो? यासाठी चाहते धडपड करत असतात. त्याच्यासोबत फोटो आणि सेल्फी घेण्यासाठी अनेकदा चाहत्यांना पाहत असतो. पण, तुम्हाला हे माहितीये का की, चाहत्यांच्या अशा वागणुकीमुळे सेलिब्रिटींना किती त्रास होत असेल? अनेकदा सेलिब्रिटी चाहत्यांच्या अशा वागण्याला खूप त्रासतात. बॉलिवूडमध्ये असे काही स्टार्स आहेत ज्यांना चाहत्यांच्या अशा वागण्याचा वाईट अनुभव आला आहे. पाहूयात मग कोण आहेत हे सेलिब्रिटी...
 
* सोनाक्षी सिन्हा 
‘बॉलिवूडची दबंग गर्ल’ सोनाक्षी सिन्हा आणि खिलाडी अक्षयकुमार यांचा ‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई दोबारा’ रिलीज होणार होता. चित्रपट बॉक्स आॅफिसवर चांगली कमाई करू दे म्हणून प्रार्थना करण्यासाठी ‘अजमेर दर्गाह’ येथे गेले होते. मात्र, तिच्या चाहत्यांनी तिला तिथपर्यंत जाऊच दिले नाही. सर्वांनी तिला घेरले. सोनाक्षी एकदम गडबडली पण, अक्षयने प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेऊन लगेचच तिला स्वत: कव्हर केले. * करिना कपूर खान 
‘बजरंगी भाईजान’ हा चित्रपट करिना कपूर खानसाठी फारच लकी ठरला. बॉक्स आॅफीसवर चित्रपटाने प्रचंड कमाई केली आहे. एके ठिकाणी प्रमोशनसाठी गेल्यावर करिना कपूर खानला चाहत्यांनी घेरले. तिच्या जवळ जाण्याचा तसेच तिला स्पर्श करायचा प्रयत्न चाहत्यांनी सुरू केला. मात्र, तिने स्वत:ला सांभाळले. प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेऊन स्वत:चा संयम पाळला आणि या फॅन्सच्या गर्दीतून बाहेर पडली.

                                                    

* कॅटरिना कैफ 
सर्व अभिनेत्रींचे नाव घेत असताना कॅटरिना कैफचे नाव कसे काय विसरू शकते? तिला देखील असेच फॅन्सच्या गर्दीला सामोरे जावे लागले होते. ‘तीस मार खाँ’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ती एके ठिकाणी गेली असता तेथील गर्दी एकवटली. गर्दी पाहताच अक्षय कुमारने प्रसंगावधात राखून कॅटरिना कैफला स्वत:च्या जवळ ओढून घेतले. तिला गर्दीपासून दूर करत संरक्षण दिले.

                                   

* सोनम कपूर 

‘रांझणा’ चित्रपटात सोनम कपूर आणि धनुष हे दोघे मुख्य भूमिकेत दिसले होते. या चित्रपटाची बरीच चर्चा झाली. पण, जेव्हा हे दोघे ‘रांझणा’ चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद पाहण्यासाठी थिएटरवर गेले. तेव्हा सोनमला सर्व चाहत्यांनी घेरले. सोनमला कडक सुरक्षितता असून देखील सर्वजण तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होते. पण, धनुषने लगेचच तिला कव्हर करून गर्दीपासून तिला दूर केले.

                                   

* दीपिका पादुकोण 

दीपिका पादुकोण  ही देखील चाहत्यांच्या या गर्दीपासून स्वत:ला काही वाचवू शकली नाही. दिवाळीनिमित्त एका मॅगझीनच्या स्पेशल लाँचिंगवेळी एका ठिकाणी फॅन्सनी तिला घेरले. ते तिला यातून बाहेर पडूच देत नव्हते. अखेर सेक्युरिटीला बोलवावे लागले. त्यानंतरच तिची गर्दीतून सुटका झाली. 

                                                   

* सुष्मिता सेन

बोल्ड आणि बिनधास्त मुव्ह्जसाठी सुष्मिता सेन ही प्रसिद्ध आहे. ती अनेकदा इव्हेंटला आल्यावर अशाच गर्दीमध्ये अडकली होती. पूण्यात एका इव्हेंटला ती आली असता तिला काही क्रेझी फॅन्सनी घेराव घातला. ती फारच कसोशीने या गर्दीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होती. मात्र, परिस्थिती अजूनच बिकट होण्याअगोदर ती या गर्दीतून सुटली. 

                                                    

* नर्गिस फाखरी 
‘क्यूट अ‍ॅण्ड ब्युटीफुल’ नर्गिस फाखरी ही ‘अजहर’ चित्रपटाच्या प्रमोशनवेळी एका फॅनच्या वागणुकीमुळे खूपच त्रस्त झाली होती. तो फॅन वॉर्निंग देऊन देखील तिचे सतत फोटो काढत होता. काही वेळानंतर इमरान हाश्मी या प्रकरणात पडला. त्याने हा प्रसंग मोठ्या चतुराईने हाताळून त्या फॅनपासून नर्गिसची सुटका करून घेतली.
Web Title: Shocking: Bollywood actors have been suffering from fans!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.