SHOCKING !! Arjun Kapoor attack on the sets of the film! | SHOCKING!! ​ चित्रपटाच्या सेटवर नशेत तर्र चाहत्याचा अर्जुन कपूरवर हल्ला!

होय, ऐकता ते खरे आहे. बॉलिवूडचा दिग्गज निर्माता बोनी कपूर याचा मुलगा व सर्वांचा लाडका अभिनेता अर्जुन कपूर यांच्यावर एका नशेत तर्र असलेल्या व्यक्तिने हल्ला चढवला. या हल्ल्यात अर्जुनला किरकोळ दुखापत झाली. 
सध्या अर्जुन ‘संदीप और पिंकी फरार’ या चित्रपटात बिझी आहे. याच चित्रपटाच्या सेटवर ही घटना घडली. उत्तराखंडच्या पिथौरागड येथे चित्रपटाचे शूटींग सुरु होते. याचेळी कमल कुमार नामक व्यक्ति अर्जुनच्या व्हॅनिटी व्हॅनजवळ आला. मी तुझा खूप मोठा चाहता आहे, असे म्हणत त्याने हस्तांदोलनासाठी हात पुढे केला. अर्जुनने पुढे येत, त्याच्याशी हात मिळवला. पण याचदरम्यान या चाहत्याने अर्जुनचा हात जोरात पिरगाळला. यानंतर या चाहत्याला लगेच ताब्यात घेण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वत:ला अर्जुनचा चाहता सांगणारी कमल कुमार पेशाने वाहनचालक आहे. अर्जुनवर हल्ला केला तेव्हा तो दारूच्या नशेत होता. या घटनेनंतर कमलची कार जप्त करण्यात आली असून त्याच्यावर १० हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
‘संदीप और पिंकी फरार’मध्ये अर्जुन कपूर पोलिस कर्मचाºयाच्या भूमिकेत आहे. त्याच्यासोबत परिणीती चोप्रा मुख्य भूमिकेत आहे. अर्जुन व परिणीती या जोडीचा हा दुसरा चित्रपट आहे. याआधी ‘इशकजादे’मध्ये ही जोडी एकत्र दिसली होती. ‘संदीप और पिंकी फरार’नंतर ही जोडी ‘नमस्ते कॅनडा’ या चित्रपटातही एकत्र दिसणार आहे. ‘संदीप और पिंकी फरार’ पुढील वर्षी आॅगस्टमध्ये रिलीज होणार आहे.

ALSO READ :या कारणामुळे अर्जून कपूर आणि परिणीती चोप्रा एकमेकांशी बोलणं टाळतात

काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत बोलताना अर्जुन कपूरने या चित्रपटाबद्दल एक हिंट दिली होती. ‘संदीप और पिंकी फरार’हा चित्रपट भारत विरूद्ध इंडिया या कल्पनेवर आधारित असल्याचे त्याने सांगितले होते. गेल्या काही काळात आपला देश भारत विरूद्ध इंडिया अशा वेगळ्यात गुंत्यात फसलेला दिसतोय. दोन वेगवेगळ्या विचारधारांचा संघर्ष देशात पाहायला मिळतो आहे. ‘संदीप और पिंकी फरार’यातील बदल लोकांच्या आयुष्यात कशी उलथापालथ घडवू शकतात, हे या चित्रपटात दिसेल, असे त्याने सांगितले होते. 

Web Title: SHOCKING !! Arjun Kapoor attack on the sets of the film!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.