काही दिवसांपूर्वी अभिनेत्री नेहा धूपिया हिच्या प्रेग्नंसीच्या बातम्या मीडियाच्या गॉसिप्स सेक्शनमध्ये दिसल्या. प्रेग्नंट असल्यामुळेच नेहाने गुपचूप आणि घाईघाईत लग्न उरकले, असे सांगितले गेले. अर्थात नेहाने या बातम्या अफवा असल्याचे सांगत याला सडेतोड उत्तर दिले. आता नेहानंतर आणखी एका अभिनेत्रीच्या प्रेग्नंसीच्या बातम्या जोरात आहेत. होय, ही अभिनेत्री आहे, शिल्पा शेट्टी. शिल्पा शेट्टीला एक सहा वर्षांचा मुलगा आहे. या मुलापाठी शिल्पा दुस-यांदा प्रेग्नंट असल्याची चर्चा सध्या सुरु झाली आणि मग सगळा सोशल मीडियाने ही चर्चा चवीने चघळली. अर्थात याला कारणीभूत ठरला तो  शिल्पाचा एक फोटो.या फोटोत शिल्पा एका पॅथॉलॉजी लॅबमधून बाहेर येताना दिसली. शिल्पाचा हा फोटो पाहताक्षणीच व्हायरल झाला आणि पाठोपाठ शिल्पा दुस-यांदा प्रेग्नंट असल्याची चर्चाही सुरु झाली. केवळ इतकेच नाही तर यावरून इंटरनेटवर वेगवेगळ्या प्रकारचे मीम्सही व्हायरल झालेत. दया दाल में कुछ तो काला है...यासारख्या सीआयडीमधला लोकप्रीय संवादावरून शिल्पाची मजा घेणे सुरु झाले.यावर कडी म्हणजे, #ShilpaKoKyaHua, हा हॅगटॅगही ट्विटरवर टॉप लिस्टमध्ये ट्रेंड करायला लागला.शिल्पाच्या फोटोत तिच्या हाती एक फाईलही दिसतेय. या फाईलवरून लोकांनी सोशल मीडियावर लिहिले़ ‘सब टेस्ट ठीक है ना,’ असे लोकांनी तिला विचारले.आता इतका सगळा बोभाटा झाल्यावर शिल्पाला खुलासा करावाच लागला. तिने प्रेग्नंसीची बातमी साफ खोडून काढली. ‘कुछ नहीं है भगवाऩ़़ बस, रूटीन चेकअपसाठी गेली होती. मी बाहेरून  फिट आहे तितकीच आतूनही आहे का, हे मला जाणून घ्यायचे होते आणि मी प्रेग्नंट नाही,’असे शिल्पाने लिहिले. अर्थातचं तिचा हा खुलासा येईपर्यंत तिच्या प्रेग्नंसीच्या बातमीने लोकांचे चांगलेच मनोरंजन केले.

ALSO READ : इतक्या वर्षांत इतकी बदलली शिल्पा शेट्टी; जुने फोटो पाहून बसणार नाही विश्वास!!
Web Title: Shilpa Shetty's 'Pregnancy' came in a photo! Trend has come, 'What happened to Shilpa' hashtag !!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.