Shilpa Shetty is the second pregnant woman; But do not know her! Read, what is the matter !! | ​दुस-यांदा प्रेग्नंट आहे शिल्पा शेट्टी; पण तिलाच कळेना! वाचा, काय आहे मामला!!
​दुस-यांदा प्रेग्नंट आहे शिल्पा शेट्टी; पण तिलाच कळेना! वाचा, काय आहे मामला!!
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिच्याबद्दल एक गुड न्यूज आहे. होय, शिल्पा दुस-यांदा प्रेग्नंट असल्याची खबर आहे.  शिल्पाला पहिला मुलगा आहे. पण आता शिल्पा दुस-यांदा आई होणार आहे आणि ही गोड बातमी शिल्पाने सर्वात आधी बहीण शमिता शेट्टीसोबत शेअर केलीयं. आता शिल्पाच्या प्रेग्नंसीची बातमी चाहत्यांमध्ये वा-यासारखी पसरण्यापूर्वी,  ही एक गंमत आहे, हे आम्ही सांगू इच्छितो. कारण तूर्तास तरी दुस-यांदा आई होण्याचा शिल्पाचा इरादा नाही. मग हा सगळा मामला काय? तर दिग्दर्शक अनुराग बासू यांचा खोडसाळपणा.होय, सध्या शिल्पा व अनुराग बासू दोघेही एक डान्स रिअ‍ॅलिटी शो ‘सुपर डान्सर2’ जज करत आहेत. या शोदरम्यान अनुरागदांना हा खोडसाळपणा सुचला. त्यांनी काय केले तर सेटवर ब्रेकदरम्यान  हळूच शिल्पाचा मोबाईल पळवला आणि मग तिच्या फोनवरून शमिता शेट्टीला मॅसेज केला. हा मॅसेज काय होता, तर तो होता,‘ मी प्रेग्नंट आहे’ असा. शिल्पाच्या मोबाईलमधून मॅसेज आल्यानंतर शमिताला शंका घ्यायला जागाच नव्हती. मॅसेज वाचून ती तर नुसती आनंदात नाचू लागली. लागलीच, तिने शिल्पाला फोन केला आणि तिचे अभिनंदन करू लागली. शमिता अचानक अभिनंदन का करतेयं, हे शिल्पाला कळेना. मग हळूच, हे अभिनंदन कशासाठी, हे शिल्पाला कळले आणि ती अवाक् झाली.  मी प्रेग्नंट नाहीयं, हे तिने शमिताला पटवून देण्याचा बराच प्रयत्न केला. पण शमिता काही जुमानेना. दोघी बहिणींचे असे गंभीर बोलणे सुरु असताना अचानक शिल्पाचे लक्ष अनुरागदांकडे गेले आणि मग तिचा ट्युबलाईट पेटला. हा सगळा अनुरागदांचा खोडसाळपणा आहे, हे तिच्या लक्षात आले. मग काय, ती अन् अनुरागदां जाम हसत सुटले. 

ALSO READ: शिल्पा शेट्टीच्या गळ्यातील स्कार्फची किंमत वाचून तुम्हाला भोवळ येईल, वाचा सविस्तर!

शिल्पा व अनुराग यांनी ‘मेट्रो’या चित्रपटात एकत्र काम केलेय, या चित्रपटाच्या शूटींगदरम्यानही शिल्पा अनुराग यांच्या प्रैंकची शिकार ठरलीय. एकदा अनुराग यांनी शूट सुरु असताना शिल्पाच्या माईकमधून बॅटरी काढून घेतली होती. यानंतर सीनमध्ये शिल्पाचा आवाज येणे बंद झाले होते. यावेळी शिल्पा हसूनहसून लोटपोट झाली होती.
Web Title: Shilpa Shetty is the second pregnant woman; But do not know her! Read, what is the matter !!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.