Shilpa Shetty Husband Raj kundra Shared Exercise Video Viral | शिल्पा शेट्टीच्या 'या' गोष्टीमुळे पती राज कुंद्राला मिळाली प्रेरणा, तासनतास गाळू लागला घाम
शिल्पा शेट्टीच्या 'या' गोष्टीमुळे पती राज कुंद्राला मिळाली प्रेरणा, तासनतास गाळू लागला घाम

कलाकार मंडळी कायम त्यांच्या कामातच बिझी असतात. शुटिंगच्या धबडग्यात त्यांना इतर गोष्टींसाठी किंवा आपल्या कुटुंबीयांना वेळ देणं तितकं शक्य नसतं. मात्र काही जण याला अपवाद असतात. सारं काही सांभाळून हे कलाकार आपल्या कुटुंबाला तितकाच वेळ देतात, शिवाय इतर गोष्टींसाठी आवर्जून वेळ काढतात. आपल्या आवडीनिवडीच्या गोष्टींसाठी ते वेळ राखून ठेवतात. या काळात कलाकार आपले छंद आणि आवड जपतात. अशाच कलाकारांपैकी एक म्हणजे अभिनेत्री म्हणजे शिल्पा शेट्टी. शिल्पाला योगाची आवड आहे हे जगाला माहिती आहे. कितीही बिझी असले तरी शिल्पा आपल्या वर्कआऊटकडे दुर्लक्ष करत नाही. तिने वर्कआऊटच्या काही सवयी स्वतःला लावून घेतल्या आहे. तिचे ती नित्यनियमाने आणि काटेकोरपणे पालन करते. 

 

आता असेच फिटनेसचे वेड शिल्पाचा पती राज कुंद्रालाही लागले आहे. म्हणूनच आता राज कुंद्राही शिल्पासह जिममध्ये वर्कआऊट करताना पाहायला मिळत आहे. नुकतेच शिल्पाने राज कुंद्रा वर्कआऊट करत असल्याचा तिने आपल्या इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेयर केला आहे. त्यात शिल्पा राज कुंद्राच्या पाठीमागे मस्ती अंदाजात इशारे करताना पाहायला मिळते. तसेच वर्कआऊट करण्यात पती राज कुंद्राला ती सपोर्टही करत असल्याचे पाहायला मिळत आहे.  शिल्पा आणि राज यांच्या या व्हिडीओला खूप सारे लाइक्स आणि कमेंटस मिळत असल्याचे पाहायला मिळतंय. या दोघांचा व्हिडीओ तुम्हालाही जिममध्ये जाऊन वर्कआऊट करण्यासाठी प्रेरणा देईल. फिटनेसबाबत असलेली ही सजगता आणि नियमित वर्कआऊट करणे यामुळे शिल्पा फिट आणि आरोग्यदायी आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. 

 


Web Title: Shilpa Shetty Husband Raj kundra Shared Exercise Video Viral
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.