Sheddvi remembers watching the trailer trailer, ... Sridevi and Janwavi realized in Kapur | ​धडकचा ट्रेलर पाहून प्रेक्षकांना आठवली श्रीदेवी... श्रीदेवी आणि जान्हवी कपूरमध्ये जाणवले हे साम्य

आज जान्हवी कपूरचा पहिला डेब्यू सिनेमा ‘धडक’चा ट्रेलर रिलीज झाला. गेल्या अनेक दिवसांपासून या ट्रेलरची प्रतीक्षा होती. अखेर ही प्रतीक्षा संपलीच. ‘धडक’ हा ‘सैराट’ या ब्लॉकबस्टर मराठी चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे, हे आपण जाणतोच. ‘झिंग झिंग झिंगाट’च्या तालावर या ‘सैराट’ने सिने रसिकांना अक्षरशः याड लावलं. सिनेमाच्या कथेपासून सगळ्याच गोष्टी खास होत्या. त्यामुळे तिकीट खिडकीवरही ‘सैराट’ने सगळे रेकॉर्ड मोडले आहेत. पण निश्चितपणे ‘सैराट’पेक्षा ‘धडक’चा बाज वेगळा आहे, हे ट्रेलर पाहून जाणवते. हा ट्रेलर पाहून श्रीदेवीच्या चाहत्यांना प्रचंड आनंद झाला आहे. श्रीदेवी आज हयात असती तर ती खूप खूश झाली असती असे तिच्या फॅन्सचे म्हणणे आहे तर श्रीदेवीच्या अनेक फॅन्सना हा ट्रेलर पाहून श्रीदेवी आणि जान्हवीमध्ये एक साम्य असल्याचे जाणवले आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये जान्हवीचा आवाज हा अगदी श्रीदेवीसारखा असल्याचे तिच्या फॅन्सना वाटले आहे. ट्रेलर डोळे मिटून ऐकला तर आपण श्रीदेवीचाच आवाज ऐकत आहे असे वाटत असल्याचे श्रीदेवीच्या अनेक फॅन्सचे म्हणणे आहे. 
दिगवंत अभिनेत्री श्रीदेवी यांनी आपल्या मुलीच्या लॉँचिंगची जबाबदारी करण जोहरवर सोडली होती. श्रीदेवींनी या चित्रपटासाठी जान्हवीला खास तयार केले होते. जान्हवीच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटपासून डान्सिंग क्लासपर्यंत सगळ्यांवर श्रीदेवींची नजर असायची. मुलीचा डेब्यू सिनेमा पाहण्यासाठी श्रीदेवी आतूर होत्या. 
धडक हा चित्रपट राजस्थानी पार्श्वभूमीवर आधारित आहे. यात जान्हवी आणि इशान खट्टर दोघेही राजस्थानी टोनमध्ये बोलताना दिसताहेत. ट्रेलरमधील जान्हवी कपूर आणि शाहिद कपूरचा भाऊ इशान खट्टर यांची केमिस्ट्रीही अफलातून आहे. चित्रपटातील अनेक सीन्स ‘सैराट’ची आठवण करून देतात, पण जान्हवी आणि इशान या नव्या कोऱ्या जोडीला पाहणे, एक नवा अनुभव आहे. तुम्हाला ठाऊक आहेच की, जान्हवीचा हा पहिला चित्रपट आहे. पण इशानचा दुसरा सिनेमा आहे. यापूर्वी इशानचा ‘बियॉन्ड द क्लाऊड्स’ रिलीज झाला आहे. या चित्रपटातील इशानच्या भूमिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. 

Also Read : ​जान्हवी, मला माफ कर...! ‘धडक’च्या ट्रेलर रिलीजपूर्वी अर्जुन कपूरचा बहिणीसाठी भावूक संदेश!!
Web Title: Sheddvi remembers watching the trailer trailer, ... Sridevi and Janwavi realized in Kapur
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.