१८ वर्षीय शनाया कपूरची गणना बॉलिवूडमधील लोकप्रिय स्टार डॉटर्समध्ये केली जाते. शनायाला नेहमीच शाहरूख खानची मुलगी सुहाना खान आणि चंकी पांडेची मुलगी अनन्या कपूरसोबत बघण्यात आले आहे. ती तिची चुलत बहीण सोनम कपूर, खुशी कपूर, जान्हवी कपूर आणि अंशुला कपूरच्याही खूप क्लोज आहे. दरम्यान, आज शनायाविषयी सांगण्याचे कारण म्हणजे तिने पद्वीचे शिक्षण पूर्ण केले आहे. होय, संजय कपूर आणि महीप कपूरची मुलगी असलेली शनाया ग्रॅज्यूएट झाली आहे. तिच्या या आनंदात संपूर्ण कपूर परिवार सहभागी झाला असून, त्यांनी त्याचे जोरदार सेलिब्रेशन केले आहे. 
 

संजय आणि महीप दोघांनी ग्रॅज्यूएशन सेलिब्रेशन सेरेमनीचे काही फोटोज् इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. फोटोमध्ये संजय कपूर पत्नी महीप यांच्यासह खुशी कपूर आणि अंशुला कपूर यादेखील बघावयास मिळत आहेत. सेलिब्रेशनचे फोटो शेअर करताना संजय कपूरने लिहिले की, ‘ग्रॅज्युएट मुलीचा बाप.’ दरम्यान संजय कपूर आणि महीप या दाम्पत्याला शनाया आणि जहान नावाची दोन मुले आहेत. शनायाला नेहमीच सुहाना खान आणि अनन्या पांडेसोबत बघण्यात आले आहे. शनाया सोशल मीडियावर चांगलीच लोकप्रिय आहे. लवकरच ती चित्रपटात पाऊल ठेवण्याची शक्यता आहे. 
 

दरम्यान, शनायाच्या या ग्रॅज्यूएट सेलिबे्रशनचे फोटो सोशल मीडियावर अपलोड करताच चाहत्यांकडून तिला शुभेच्छा दिल्या जात आहेत. काही क्षणांतच तिच्या या फोटोला शेकडोंच्या संख्येने शुभेच्छा देणारे मॅसेज देण्यात आले आहेत. 
 

Web Title: Shanya Kapoor Graduate; Celebration done by Kapoor family!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.