'Shamsham' star goes back to Rishi Kapoor again; Female user has porn message! | ‘बेशर्म’ स्टार ऋषी कपूरचा पुन्हा गेला तोल; महिला युजरला केला अश्लील मॅसेज!

सेलिब्रेटींना हल्ली ट्विटरवर ट्रोल करणे कॉमन बाब आहे. कारण दररोज एक तरी स्टार वादग्रस्त वक्तव्यांमुळे ट्विटरवर ट्रोल होतो. काही दिवसांपूर्वीच देसी गर्ल प्रियंका चोपडाने वादग्रस्त वक्तव्य केल्याने तिला ट्रोल करण्यात आले होते. आता ऋषी कपूर नेटकºयांच्या रडारवर आहेत. वास्तविक ऋषी कपूरला ट्रोल करणे काही नवीन बाब नाही. यापूर्वीदेखील त्यांना अशाप्रकारचा सामना करावा लागला आहे. विशेष म्हणजे ऋषी कपूरनेही त्या-त्यावेळी युजर्सवर तोंडसुख घेतले आहे. आता पुन्हा एकदा त्यांचा असाच तोल गेला असून, त्यांनी थेट एका महिला युजरला शिवीगाळ केली आहे. 

त्याचे झाले असे की, ऋषी कपूरने एका महिला युजरला थेट मॅसेज करीत अश्लील शब्दाचा वापर केला. या महिला युजरनेदेखील या मॅसेजचा स्क्रीन शॉर्ट सार्वजनिकरीत्या पोस्ट केला. त्यानंतर या स्क्रीनशॉटला कॉमेण्ट्सचा जणूकाही पाऊसच पडला. बºयाचशा युजर्सनी ऋषी कपूर यांना खडे बोल सुनावले. तर काहींनी ऋषी कपूरच्या बाजूने कॉमेण्ट दिल्या. हा संपूर्ण प्रकार रात्री उशिरापर्यंत सुरू होता. त्यानंतर रात्री उशिरा ऋषीने यास उत्तर दिले. त्यांनी लिहिले की, ‘मी हे सर्व ट्विट बघत आहे. हे ट्विट मला अ‍ॅब्यूज करीत आहेत. मी काही संत नाही. मीदेखील रिअ‍ॅक्ट करणार अन् तेही तुमच्या भाषेतच करणार. त्यामुळे तुमच्या तक्रारी तुमच्याकडेच ठेवा. टिट-फॉर टॅट!हे सर्व प्रकरण तेव्हा सुरू झाले, जेव्हा एका युजरने ऋषी कपूरने पाठविलेल्या मॅसेजचा स्क्रिन शॉट काढीत तो जगजाहीर केला. हा स्क्रीन शॉट एका अपमानित करणाºया मॅसेजचा होता. या स्क्रीनशॉटला अनेकांच्या प्रतिक्रिया समोर आल्या. शिवानी चौहान नावाच्या युजरने कुठलाही विचार न करता हा स्क्रीनशॉट पोस्ट केला होता. शिवाय हा स्क्रीनशॉट शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘ऋषी कपूरने खानदानी मॅनर्स दाखविले.’

वास्तविक १३ सप्टेंबर रोजी राहुल गांधी यांनी बर्कले येथे वंशवादावर एक वक्तव्य केले होते. यावर ऋषी कपूर यांनी प्रतिक्रिया देताना एक ट्विट केले होते. त्यांनी म्हटले होते की, ‘भारतीय सिनेमामध्ये १०६ वर्षांपैकी ९० वर्ष एकट्या कपूर परिवाराचे योगदान राहिले आहे. देवाचा आशीर्वाद आहे की, आज आमची चौथी पिढी लोकांचे मनोरंजन करीत आहे. लोकांनीही त्यांना मेरिटच्या गुणांनी निवडले आहे.’ ही पोस्ट ट्विटरवर शेअर केल्यानंतर त्यास लोकांच्या कॉमेण्ट येऊ लागल्या. शिवानी नावाच्या युजरनेही ऋषी कपूर यांच्या या पोस्टला कॉमेण्ट दिली. तिने लिहिले की, ‘लोक अजून तुमच्या बेशर्मपणातून सावरले नाही अन् तुम्ही मेरिट-मेरिट म्हणून ओरडत आहात.’ त्यानंतर हा संपूर्ण प्रकार सुरू झाला. 
Web Title: 'Shamsham' star goes back to Rishi Kapoor again; Female user has porn message!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.