'Shakeela' biopic will not be shoot in Kerala but in Karnataka | 'शकीला' बायोपिकचे चित्रीकरण केरळमध्ये नाही तर कर्नाटकात पार पडणार
'शकीला' बायोपिकचे चित्रीकरण केरळमध्ये नाही तर कर्नाटकात पार पडणार

ठळक मुद्देरिचा चड्ढा साकारणार अभिनेत्री शकीलाची भूमिका

 

अभिनेत्री रिचा चड्ढा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अडल्ट स्टार 'शकीला'च्या बायोपिकमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या बायोपिकचे चित्रीकरण आता केरळमध्ये नाही तर कर्नाटकात होणार आहे. केरळमध्ये आलेल्या पुरानंतर हा बदल करण्याचा निर्णय झाला आहे. या चित्रपटामुळे कर्नाटकातील काही अनोख्या ठिकाणांची ओळख झाल्याचे दिग्दर्शक इंद्रजीत लंकेश यांनी म्हटले आहे.

याबाबत लंकेश यांनी सांगितले की, ''आम्ही कर्नाटकात लोकेशन्स निश्चित केले असून पटकथेचे कामही पूर्ण झाले आहे. ही एक नियमित प्रक्रिया आहे. आम्ही हे काम केरळमध्ये करणार होतो, पण त्यापूर्वी तिथे महापूर आला. त्यामुळे आम्हाला लोकेशन्स बदलावे लागले.''
केरळहून कर्नाटकात शूटींग स्थलांतरीत करणे आमच्यासाठी आशिर्वाद ठरला आहे. यासाठी आमच्या टीमला थोडी जास्त मेहनत करावी लागली,असेही लंकेश म्हणाले.
नव्वदच्या दशकावर आधारित हा सिनेमा आहे कारण शकिला यांचा स्टारडम त्यावेळी जास्त होते. मी या सिनेमाला घेऊन खूप उत्सुक आहे. सिनेमा थोडाफार कॉन्ट्रोव्हर्शल देखील असणार आहे कारण शकिला यांचे व्यक्तिमत्त्व तसे आहे. मी त्यांची जाऊन भेट देखील घेतली त्या फारच बिनधास्त आहेत.  आता रिचा चड्ढाला शकीलाच्या भूमिकेत पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.


Web Title:   'Shakeela' biopic will not be shoot in Kerala but in Karnataka
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.