बॉलिवूडचा किंग शाहरूख खानची लाडकी लेक सुहाना खानचे काही फोटोज् सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे फोटो लंडनमधील एका प्रायव्हेट क्लबमधील आहेत. याठिकाणी सुहाना काही महिलांसोबत दिसत आहे. यावेळी सुहानाने ब्लॅक वन पीस, जॅकेट आणि बुट्स घातले आहेत. या लूकमध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे. मॉम गौरी खानने सुहानाचे हे फोटो तिच्या इन्स्टाग्रामवरही पोस्ट केले. फोटोच्या कॅप्शनमध्ये ‘The British charm’ असे लिहिले. सध्या सुहाना लंडन येथे तिचे शिक्षण पूर्ण करीत आहे. सुहानाच्या फॅन क्लबने आणखी एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती लंडनमधील रस्त्यावर फ्रेंडसोबत फिरताना दिसत आहे. यावेळी सुहानाने मिनी स्कर्ट, नॉटेड शर्ट आणि टॉप परिधान केला आहे. अभिनयाची प्रचंड आवड असलेली सुहाना लवकरच बॉलिवूडच्या दिशेने पाऊल टाकणार आहे. याबाबतचा खुलासा स्वत: मॉम गौरी खानने काही महिन्यांपूर्वी एक इव्हेंटमध्ये केला होता. त्याचे झाले असे की, गौरीला जेव्हा एका अवॉर्ड शोमध्ये मुलगी सुहानाविषयी विचारण्यात आले तेव्हा तिने सांगितले की, सुहाना सध्या एका मॅगझीनच्या फोटोशूटची तयारी करण्यात व्यस्त आहे. मात्र यावेळी गौरीने या मॅगझीनचे नाव स्पष्ट केले नाही. सुहानाचे हे पहिलेच फोटोशूट असणार आहे. वृत्तानुसार, सुहाना ज्या मॅगझीनच्या कव्हर पेजवर बघावयास मिळणार आहे, ते पुढच्या महिन्यातच प्रसिद्ध होणार आहे. दरम्यान, सुहानाने धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शालेय शिक्षण घेतले. तिला डान्स आणि स्पोर्ट्स खूप आवडतात. ती शाळेत असताना बºयाचशा स्पोर्ट्स इव्हेंटमध्ये सहभागी व्हायची. शाहरूखची अशी इच्छा आहे की, तिने एक चांगली डान्सर म्हणून जगभरात नाव कमवावे. सध्या सुहाना लंडनमध्ये हायर एज्युकेशनचे शिक्षण घेत आहे. सुहाना सोशल मीडियावर जबरदस्त अ‍ॅक्टिव असते. आपल्या फ्रेंड सर्कलसोबतचे बरेचसे फोटो ती तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करीत असते. 
Web Title: Shahrukhchi lake suhana khan, found in the club of London, see photo!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.