Shahrukhane Manali 'or' defeat in front of the actor | शाहरुखने मानली ‘या’ अभिनेत्यासमोर हार

किंग खान त्याच्या किलर लूक्स आणि रोमॅण्टिक इमेजसाठी ओळखला जातो. त्याला रोमान्सचा बादशाह उगीच नाही म्हणत. तो बॉडी बिल्डिंगच्या फंद्यात जास्त पडत जरी नसला तरी ‘सिक्स पॅक’ शब्द घरोघरी पोहचविण्याचे खरे श्रेय त्यालाच जाते.

‘हॅपी न्यू इयर’मधील त्याची पीळदार शरीरयष्टी पाहून तर कोणालाही हेवा वाटेल. पन्नाशीचा शाहरुख अशी बॉडी कशी बनवू शकतो? असे आपल्याला आश्चर्य वाटत असले तरी शाहरुख म्हणतो, मला जास्त व्यायाम करायला आवडत नाही. आमिर ज्याप्रकारे प्रत्येक चित्रपटातील भूमिकेसाठी शरीरावर मेहनत घेतो तसे करणे मला कधीच जमू शकत नाही. दोन वर्षांपूर्वी मी जेव्हा त्याला भेटलो होतो तेव्हा त्याचे वजन खूप वाढलेले होते. आता पाहतो तर विश्वास बसत नाही त्याने एवढे वजन कमी केले.

अशी अंगतोड मेहनत मी तर नाही घेऊ शकत. शाहरुखने ‘ओम शांती ओम’मध्ये सिक्स पॅक्स बनवले तर आमिरने ‘गजिनी’साठी दोन पाऊलं (सॉरी पॅक!) पुढे जाऊन ‘एट पॅक्स’ मिळवले होते. एका प्रकारे शाहरुखने आमिरसमोर हारच मानली, नाही का!
Web Title: Shahrukhane Manali 'or' defeat in front of the actor
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.