Shahrukh Khan's son, Aryan Khan, is the 'foreigner'? | ​शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानसोबतची ‘ही’ विदेशी तरूणी कोण?

किंगखान शाहरूख खानची मुले सोशल मीडियावर जाम लोकप्रिय आहेत. विशेषत: अबराम. अबरामची एक झलक पाहण्यासाठी चाहते अख्खा सोशल मीडिया पिंजून काढतात. फॅन फॉलोर्इंगच्याबाबतीत शाहरूखचा मोठा मुलगा आर्यन खान हाही कमी नाही. आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमुळे आर्यन कायम चर्चेत असतो. सध्या त्याचा एका मिस्ट्री गर्लसोबतचा फोटो असाच चर्चेत आहे.
हा फोटो आर्यनची बहीण सुहाना खान हिच्या फॅन बेस इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला गेला आहे. यात आर्यन कुण्या विदेशी तरूणीसोबत दिसतोय. या फोटोला कुठलेही कॅप्शन दिलेले नाही. त्यामुळे फोटोतील तरूणी आर्यनची मैत्रिण आहे की, सुहानाची हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण हा फोटो इंटरनेटवर वेगाने व्हायरल होतो आहे. या फोटोत आर्यन ब्लॅक ड्रेसमध्ये आहे तर विदेशी मुलगी रेड कलरच्या शॉर्ट ड्रेसमध्ये आर्यनला साईड हग करताना दिसतेय.आर्यनने लंडनच्या सेवनआॅक्स स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केले आहे. आता तो अमेरिकेत फिल्ममेकिंगचा कोर्स करतोय. आर्यन  लंडनच्या ज्या शाळेत शिकला. त्याच शाळेत अमिताभ बच्चनची नात नव्या नवेली ही सुद्धा शिकली आहे. शाहरूखच्या ‘कभी खुशी कभी गम’ या चित्रपटात आर्यनने बालकलाकाराची भूमिका साकारली होती. २००१ मध्ये हा चित्रपट आला होता. तेव्हा आर्यन केवळ चार वर्षांचा होता.
आर्यनची डॅड शाहरूखसोबतची चांगली बॉन्डिंग आहे. पण मॉम गौरीच्या तो जरा  जास्तच जवळ आहे. शाहरूखनेआपल्या एका मुलाखतीत त्याच्या तिन्ही मुलांचे गौरीसोबत वेगळेच नाते असल्याचे म्हटले होते. मी माझ्या मुलांसोबत खेळतो, दंगा करतो, चर्चा करतो. मी त्यांचा डॅड कमी अन् मित्र जास्त असतो. गौरीचे म्हणाल तर तिचे मुलांसोबत एक वेगळेच नाते आहे. पालक म्हणून गौरी मुलांसोबत वावरते. त्यांच्या चर्चा वेगळ्या असतात. मी कधीही त्यात पडत नाही. त्यांचे बॉन्डिंग वेगळेच आहे, असे शाहरूखने या मुलाखतीत सांगितले होते.
शाहरूख व गौरीचा मोठा मुलगा आर्यन आता १८ वर्षांचा झाला आहे आणि सुहानासोबत त्याच्याही बॉलिवूड डेब्यूच्या चर्चा रंगत आहेत. 
Web Title: Shahrukh Khan's son, Aryan Khan, is the 'foreigner'?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.