शाहरूख खान पुन्हा एकदा करणार 'चक दे इंडिया'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2018 10:00 AM2018-10-10T10:00:44+5:302018-10-10T10:01:51+5:30

हॉकी संघाने शाहरूख खानला मैदानात उतरण्यासाठी सांगितले आणि शाहरूख खानदेखील पुन्हा एकदा चक दे इंडिया बोलण्यासाठी तयार आहे.

Shahrukh Khan will again do Chak De India | शाहरूख खान पुन्हा एकदा करणार 'चक दे इंडिया'

शाहरूख खान पुन्हा एकदा करणार 'चक दे इंडिया'

googlenewsNext
ठळक मुद्देशाहरूख खान हॉकी संघासोबत उतरणार मैदानातशाहरूखने हॉकी संघाला दिल्या शुभेच्छा

बॉलिवूडचा किंग खान शाहरूख खान पुन्हा एकदा चक दे इंडिया म्हणताना दिसणार आहे. 2007 साली शाहरूखचा 'चक दे इंडिया' हा सिनेमा रिलीज झाला. या सिनेमाला रसिकांचे भरभरून प्रेम मिळाले. आजही हा चित्रपट प्रेक्षकांच्या चांगला लक्षात आहे. मात्र यावेेळेस शाहरूख खान रुपेरी पडद्यावर नाही तर खऱ्या मैदानात चक दे इंडिया करताना दिसणार आहे आणि तेदेखील भारतीय हॉकी संघासोबत. 

खरेतर भारतीय हॉकी संघातील खेळाडूंनी शाहरूख खानला आपल्यासोबत हॉकी खेळण्यासाठी निमंत्रण दिले आहे. टीमने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात पूर्ण हॉकी टीम शाहरूख खानला मैदानात हॉकी खेलण्यासाठी बोलवत आहेत आणि सोबतच चक देच्या माध्यमातून सपोर्ट मागत आहेत. खेळाडूंनी किंग खानला सांगितले की, 'तुम्ही दाखवून द्या की तुमचे हृदय देखील हॉकीसाठी धडकते. आता शाहरूख खान त्यांच्यासोबत हॉकी खेळण्यासाठी मैदानात उतरेल का, हे जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. या व्हिडिओ उत्तरदेखील किंग खानने दिले आहे. शाहरूखने ट्विटरवर लिहिले की, नेकी आणि पूछ पूछ. मी उडी मारून पोहचेन त्या ठिकाणी. हॉकी देशाची शान आहे आणि माझ्याकडून टीमला खूप शुभेच्छा. माझ्याबद्दल विचार केला म्हणून मी आभारी आहे आणि हो... माझे हृदय हॉकीसाठी खूप जोरात धडकते आहे.'

शाहरूख खान हॉकी टीमसोबत खेळायला मैदानात कधी उतरतो व किती गोल मारतो हे पाहण्यासाठी आता प्रतीक्षा करावी लागेल. नक्कीच हा सामना बॉलिवूड व हॉकी प्रेमींसाठी अविस्मरणीय ठरेल.

Web Title: Shahrukh Khan will again do Chak De India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.