Shahrukh Khan wants to run the house even after becoming a superstar | सुपरस्टार झाल्यानंतरही घर चालवण्यासाठी शाहरुख खान करायचे 'हे' काम

ज्यावेळी बॉलिवूडमध्ये अनिल कपूर आणि सनी देओल सारख्या सुपरहिट अभिनेत्यांची क्रेझ होती. त्याचदरम्यान शाहरुख खानने आपल्या करिअरला सुरुवात केली. यातही शाहरुख खानचे चित्रपट हिट जात होते. त्यावेळी दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे चित्रपटाने जवळपास 60 कोटींचा बिझनेस केला होता. यानंतर पूर्ण देशात शाहरुखच्या फॅन फ्लॉईंगमध्या वाढ झाली होती. मात्र शाहरुखला खरी प्रसिद्धी छोट्या पडद्यावरील एक अॅडमधून मिळाली होती. शाहरुखला अॅडमध्ये काम करण्यास कोणतीच हरकत नव्हती. कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना त्यांने काही अॅड तयारदेखील केल्या होत्या. शाहरुख कमी पैशात काम करणारा सुपरस्टार बनला होता.    

अनुपमा चोप्राच्या शाहंशाह ए बॉलिवूड पुस्तकाच्या अनुसार, ज्यावेळी आमीर खान एका अॅड शूटसाठी 7 कोटींचे मानधन घ्यायचा त्यावेळी शाहरुख अर्ध्या पैशात काम करायचा. शाहरुख खान चित्रपट आपल्या आवडीसाठी चित्रपटात काम करायचा तर घर चालवण्यासाठी तो अॅडमध्ये काम करायचा.  जस-जसे शाहरुख खानचा स्टारडम वाढत गेले तेव्हा शाहरुखने अॅडसाठींचे मानधन 4 कोटींवरुन 10 कोटींवर केले. अॅडसाठी सगळ्यात जास्त मानधन अमिताभ बच्चन आणि सचिन तेंडुलकर आकारायचे.  आता या लिस्टमध्ये शाहरुख खानचे नाव देखील सामील झाले आहे. 1998मध्ये फिल्मफेअरला दिलेल्या इंटरव्ह्यु दरम्यान शाहरुखने सांगितले होते. मला माझ्या बंगल्यासाठी पैशाची गरज होती. मला माझ्या मुलाचे भविष्य सुरक्षित करायचे होत्यासाठी मला पैशांची गरज होती. आर्थिक स्थैर्य आण्यासाठी मला पैशांची गरज होती आणि यासाठी मी कोल्डड्रिंक पण विकले आणि कंडोमसुद्धा. अनेक अभिनेत्यांना अॅडमध्ये काम करणे छोटे काम वाटते. जे अॅडमध्ये काम करतात त्यांच्याकडे कोणते काम नाहीये असा समज होतो. मात्र शाहरुख खान असा एकमेक सुपरस्टार आहे जो कंडोम विकायला सुद्धा तयार होता.  

ALSO READ :  गौरी खानच्या या ड्रेसची किंमत ऐकून तुम्ही व्हाल अवाक !

शाहरुख खानचा अनुष्का शर्मासोबत काही दिवसांपूर्वी रिलीज झालेला जब हॅरी मेट सेजल चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला. तसेच तो लवकरच एक हॉरर चित्रपटाची निर्मिती करणार असल्याचे समजते आहे.   
Web Title: Shahrukh Khan wants to run the house even after becoming a superstar
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.