Shahrukh Khan starrer Salute movie revolves around role of actress | शाहरुख खान स्टारर सैल्यूट चित्रपटातून अभिनेत्रीच्या भूमिकेवर फिरणार कात्री, हे आहे त्यागील कारण

शाहरुख खान स्टारर 'सैल्यूट'मध्ये निर्माता अभिनेत्रीच्या भूमिकेवर कैची मारण्याच्या विचारात आहे. त्याला कारणही तसेच आहे. या चित्रपटात राकेश शर्मा यांच्या पत्नीची भूमिका साकारण्यासाठी करिना कपूर आणि प्रियांका चोप्राला ऑफर देण्यात आली होती. मात्र यात अभिनेत्रीच्या भूमिकेला फारसा स्कोप नाहीय त्यामुळे या दोघांनी ही ऑफर नाकारली आहे. त्यानंतर आता नवी माहितीसमोर आली आहे की, निर्माता आणि दिग्दर्शक आता या चित्रपटातील अभिनेत्रीची भूमिका कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. मेकर्सचा विचार आहे की या भूमिकेसाठी एखाद्या नवख्या अभिनेत्रीला साईन करावे.  

सैल्यूट मध्ये राकेश शर्मा यांची भूमिका साकारण्याची ऑफर आधी आमिर खानला दिली होती. मात्र काही कारणांमुळे आमिरने तो नकारला. आमिरनेच मेकर्सना स्वत:या भूमिकेसाठी शाहरुखचे नाव सुचवले होते. याचे दिग्दर्शन महेश मथाई करणार आहेत. सैल्यूटबाबत बोलयाचे झाले तर हा राकेश शर्मा यांचा बायोपिक असणार आहे. राकेश शर्मा यांनी २ एप्रिल १९८४ साली सोयुझ टी-११ या यानातून अंतराळात जाणारा पहिला भारतीय म्हणून मान मिळविला होता. ३५ व्या राष्ट्रीय संरक्षण अकादमीचे विद्यार्थी असणारे राकेश शर्मा हे भारतीय वायूदलात टेस्ट पायलट म्हणून १९७० साली सहभागी झाले. 

ALSO READ :  ​या क्रिकेटरला डेट करतेय शाहरुख खानची लेक सुहाना खान

तूर्तास शाहरूख खान ‘झीरो’मध्ये बिझी आहे.शाहरुख खान या चित्रपटात एका बुटक्या व्यक्तीची भूमिका साकारणार आहे.  या चित्रपटातील  शाहरूखची व्यक्तीरेखा ‘गेम आॅफ थ्रोन्स’ या इंग्रजी सीरिजमधील टीरिनयल लेनिस्टर या पात्रावर आधारित असल्याचे सांगितले जात आहे. म्हणजेच, ही बुटकी व्यक्ती दुस-या लोकांमध्ये प्रेम वाढवून त्यांच्यातील दुवा ठरेल. ‘गेम आॅफ थ्रोन्स’ प्रेक्षकांच्या आवडीची शृंखला आहे. ख्रिसमसच्या मुहूर्तावर शाहरुखचा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 
Web Title: Shahrukh Khan starrer Salute movie revolves around role of actress
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.