Shahrukh Khan goes to Night Walk with son Abar ... | ​शाहरूख खान मुलगा अबरामसोबत नाईट वॉकला जातो तेंव्हा...

स्टारडम आल्यानंतर बºयाचशा गोष्टी सर्वसामान्यांसारख्या करता येत नाहीत, हे शल्य अनेकांच्या मनात असते. बॉलिवूडचा किंग खान ‘शाहरूख खान’ यालाही आपल्या मनातील इच्छा खुलेआम करता येत नाहीत. त्यामुळे बºयाचशा गोष्टी त्याला लोकांच्या नजरेबाहेर अर्थात अंधाºया रात्रीच्यावेळी कराव्या लागतात. यापूर्वी त्याने स्टारडमच्या यशामुळे काही गोष्टी करता येत नसल्याचे सांगितलेही होते. अर्थात अशा गोष्टी घडतच असतात असेही तो म्हणाला होता. त्यामुळे रात्री मुलासोबत त्याची फिरण्याची इच्छा त्याने पूर्ण केली. शाहरूखने आपला मुलगा अबरामसोबत जुहू बीचवर उशिरा रात्री नाईट वॉक केला. 
 

शाहरूख खाने स्वत:च ट्विट करून ही माहिती दिलीय. शाहरूख आणि अबराम दोघांनी मिळून वाळूचा किल्ला तयार केला. हा किती काळ राहील न राहील हे माहिती नाही, मात्र मी खूप मजा केली. 
 

शाहरूखने व्हॅलेंटाईनसंदर्भातही ट्विट केले आहे. ‘तुम्ही ज्यावेळी उठलेले असाल त्यावेळी माझा हा रोमँटिक मेसेज तुम्ही पहाल’ 
शाहरूखचा अबराम हा सर्वात लहान मुलगा असून, शाहरूख नेहमी त्याच्यासोबत मस्ती करताना दिसून येतो. रईसच्या यशानंतर शाहरूख सध्या एन्जॉय करीत आहे. आता तो आनंद एल. राय यांच्या चित्रपटात काम करणार आहे. 
Web Title: Shahrukh Khan goes to Night Walk with son Abar ...
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.