सुहाना खानची शॉर्ट फिल्म पाहण्यासाठी व्हा सज्ज! लीक झाला शूटींगचा फोटो!!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2019 10:47 AM2019-06-14T10:47:27+5:302019-06-14T10:51:18+5:30

किंगखान शाहरूख खानची लाडकी लेक सुहाना खान बॉलिवूड डेब्यू करणार, अशी अनेक दिवसांपासून चर्चा सुरु आहे. पण अद्याप सुहानाच्या डेब्यूची घोषणा झालेली नाही. पण आता एक ताजी बातमी आहे.

shahrukh khan daughter suhana khan debut in films picture going viral on social media | सुहाना खानची शॉर्ट फिल्म पाहण्यासाठी व्हा सज्ज! लीक झाला शूटींगचा फोटो!!

सुहाना खानची शॉर्ट फिल्म पाहण्यासाठी व्हा सज्ज! लीक झाला शूटींगचा फोटो!!

googlenewsNext
ठळक मुद्देमध्यंतरी संजय लीला भन्साळी सुहानाला लॉन्च करणार, अशी बातमी होती. कुण्या बड्या दिग्दर्शकाने सुहानाला लॉन्च करावे, ही शाहरूखची इ्च्छा होती.

किंगखान शाहरूख खानची लाडकी लेक सुहाना खान बॉलिवूड डेब्यू करणार, अशी अनेक दिवसांपासून चर्चा सुरु आहे. पण अद्याप सुहानाच्या डेब्यूची घोषणा झालेली नाही. पण आता एक ताजी बातमी आहे. होय, सुहानाचा डेब्यू होतोय. अर्थात बॉलिवूड चित्रपटांमधून नाही. सध्या सुहानाचा एक फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय. या फोटोत सुहाना कारच्या पुढच्या सीटवर बसलेली दिसतेय.

हा मोनोक्रॉम फोटो सुहानाच्या एका फॅन क्लब पेजवर शेअर करण्यात आला आहे. ‘सुहानाच्या आगामी लघुपटातील एक शॉट,’असे कॅप्शन या फोटोला देण्यात आले आहे. यावरून सुहाना एका शॉर्ट फिल्ममध्ये झळकणार असे मानले जात आहे. सुहानाचे मित्र ही शॉर्ट फिल्म बनवत असल्याचा दावाही केला जात आहे. अर्थात हा फोटो आणि यासंदर्भात करण्यात आलेला दावा खरा आहे की नाही हे अजून कळू शकलेले नाही.


 सुहाना सध्या लंडनमध्ये शिकतेय. गतवर्षी तिने वोग मॅगझिनसाठी कव्हर फोटोशूट केले होते. या फोटोशूटनंतर सुहानाच्या बॉलिवूड डेब्यूच्या चर्चा रंगल्या होत्या. पण शाहरुखने या बातम्या धुडकावून लावल्या होत्या. सुहाना सध्या शिकतेय. शिक्षण पूर्ण झाल्यानंतरच ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार, असे त्याने सांगितले होते. मात्र ही शॉर्ट फिल्म बघता, अभिनेत्री बनण्यासाठी सुहाना जोमात तयारी करत असल्याचे वाटते.


मध्यंतरी संजय लीला भन्साळी सुहानाला लॉन्च करणार, अशी बातमी होती.   कुण्या बड्या दिग्दर्शकाने सुहानाला लॉन्च करावे, ही शाहरूखची इ्च्छा होती. शाहरूखला काहीतरी भव्य हवे होते. आता भव्यदिव्य असे काही हवे असेल तर भन्साळींसारख्या लार्जर दॅन लाईफ दिग्दर्शकाशिवाय बॉलिवूडमध्ये अन्य दुसरा पर्याय नाही. कारण भन्साळी त्यांच्या भव्यदिव्य चित्रपटांसाठी ओळखले जातात. त्यामुळे सुहानाच्या लॉन्चिंगसाठी शाहरूखने भन्साळींच्या नावाला पसंती दिली, असे म्हटले गेले होते.

स्वत: सुहानाला पारंपरिक लव्हस्टोरीत इंटरेस्ट नाही. आपण काहीतरी वेगळे करावे. आपला डेब्यू काहीतरी वेगळा आणि यादगार व्हावा, अशी तिचीही इच्छा आहे. आता तिची ही इच्छा भन्साळी पूर्ण करतात की आणखी कुणी, ते पाहूच.

Web Title: shahrukh khan daughter suhana khan debut in films picture going viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.