किंगखान शाहरूखला साऊथ सुपरस्टार विजयची साथ! ‘थलपति 63’मध्ये साकारणार खलनायक!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2019 11:44 AM2019-04-24T11:44:53+5:302019-04-24T11:45:46+5:30

किंग खान शाहरूख खानच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. होय, लवकरच एसआरके साऊथ सुपरस्टार विजयच्या ‘थलपति 63’ या चित्रपटात दिसण्याची शक्यता आहे.

shahrukh khan all set to play villain in south star vijays thalapathy 63 | किंगखान शाहरूखला साऊथ सुपरस्टार विजयची साथ! ‘थलपति 63’मध्ये साकारणार खलनायक!

किंगखान शाहरूखला साऊथ सुपरस्टार विजयची साथ! ‘थलपति 63’मध्ये साकारणार खलनायक!

googlenewsNext
ठळक मुद्देथलपति 63’मध्ये बॉलिवूडचा एक आघाडीचा चेहरा असावा, अशी मेकर्सची इच्छा होती. शाहरूखकडे ही आॅफर आली, तेव्हा त्याने लगेच ती स्वीकारली.

किंग खान शाहरूख खानच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. होय, लवकरच एसआरके साऊथ सुपरस्टार विजयच्या ‘थलपति 63’ या चित्रपटात दिसण्याची शक्यता आहे.
शाहरूख व साऊथ दिग्दर्शक अत्ली यांच्यात ‘थलपति 63’ संदर्भात ब-याच दिवसांपासून चर्चा सुरु होती. अलीकडे या चर्चेला बळ मिळाले, ते आयपीएलदरम्यान शाहरूख व अत्ली यांच्या एकत्र येण्याने. होय, आयपीएल मॅचदरम्यान दोघेही एकत्र दिसले आणि शाहरूख ‘थलपति 63’मध्ये दिसणार, या चर्चेला पुन्हा तोंड फुटले.

सूत्रांचे मानाल तर, विजयच्या या चित्रपटात शाहरूख कॅमिओ करतान दिसू शकतो. शाहरूख चित्रपटात मुख्य खलनायकाच्या भूमिकेत असेल. क्लायमॅक्सदरम्यान त्याची एन्ट्री होईल. किंगखानच्या वाट्याला जवळजवळ १५ मिनिटांची भूमिका असेल. यादरम्यान विजय व शाहरूख यांचा एक फाईटिंग सीक्वेन्सही दिसेल.


‘थलपति 63’मध्ये बॉलिवूडचा एक आघाडीचा चेहरा असावा, अशी मेकर्सची इच्छा होती. शाहरूखकडे ही आॅफर आली, तेव्हा त्याने लगेच ती स्वीकारली. याचनिमित्ताने अत्ली शाहरूखला भेटले. या भेटीत अत्ली यांच्या डोक्यात आणखी एक कल्पना आली.  ‘मर्शल’ या चित्रपटाचा हिंदी रिमेक बनवण्याची आणि त्यात शाहरूखला कास्ट करण्याची इच्छा अत्ली यांनी यावेळी बोलून दाखवली. ‘मर्शल’च्या हिंदी रिमेकची कल्पना शाहरूखने म्हणे लगेच उचलून धरली. ‘मर्शल’ या चित्रपटातही विजय लीड रोलमध्ये होता.
एकंदर काय तर ‘थलपति 63’च्या निमित्ताने शाहरूखला ‘मर्शल’ही मिळाला. आता ‘थलपति 63’ आणि ‘मर्शल’ कधी आणि कसे आकारास येतात, ते बघूच.

Web Title: shahrukh khan all set to play villain in south star vijays thalapathy 63

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.