Shahrukh-Kat to dance for 'money' | ‘पैशासाठी’ लग्नात थिरकणार शाहरूख-कॅट?

तुम्हाला ‘फॅन’ चित्रपट आठवतोय का? त्यात शाहरूख एका बिझनेसमॅनच्या मुलीच्या लग्नात परफॉर्मन्स सादर करतो. तसंच काहीसं खऱ्या  आयुष्यात झालं तर? होय. नुकतीच शाहरूख खान आणि कॅटरिना कैफ यांना गली जनार्दन रेड्डी यांच्याकडून त्यांच्या मुलीच्या लग्नात परफॉर्मन्स सादर करण्याचा प्रस्ताव आलाय आणि तो या दोघांनी मान्यही केलाय म्हणे.

कारण, शेवटी ‘मनी मॅटर्स ना’? रेड्डी हे  शाहरूख-कॅटला त्यांना हवी असलेली रक्कम देऊ करणार आहेत. मग काय? किती धम्माल होणार हा परफॉर्मन्स? काही प्रश्न आहे का? असे कळतेय की, त्यांच्यासोबतच दाक्षिणात्य कलाकार तमन्ना भाटिया आणि प्रभु देवा हे देखील परफॉर्मन्स करताना दिसतील.
Web Title: Shahrukh-Kat to dance for 'money'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.