Shahid Kapoor in work and family failed? | काम आणि कुटुंबीयांमध्ये फसला शाहिद कपूर ?

चित्रपट पद्मावतनंतर शाहिद कपूर आपला आगामी चित्रपट 'बत्ती गुल मीटर चालू'च्या कामाला लागला आहे. या चित्रपटाची शूटिंगसाठी सध्या आपली सहकलाकारा श्रद्धा कपूरसोबत उत्तराखंडमध्ये आहे. आपल्या व्यस्त शेड्यूलमुळे शाहिदला कुटुंबीयांना वेळ द्यायला जमत नाहीयं. त्यामुळे शाहिद कपूरने आपल्या चित्रपटाची शूटिंग एक दिवस आधी संपवून तो पत्नी मीरा आणि मुलगी मिशाकडे गेला आहे.     
 
तुम्हाला सांगतो, मंगळवारी शाहिद कपूर 'बत्ती गुल मीटर चालू'च्या शूटिंग रॅपअॅप केली. त्यावेळी चित्रपटातील युनिटला वाटले शाहिद पद्मावतच्या सक्सेस पार्टी अटेंड करायला गेला आहे. मात्र शाहिद आपल्या कुटुंबीयांना भेटायला दिल्लीला गेला. सध्या मिशा आणि मीरा दिल्लीमध्ये आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहिद 25 फेब्रुवारीला कुटुंबीयांसोबत वाढदिवस साजरा करणार आहे हे आधी पासून ठरलेले होते. त्याला पद्मावतची सक्सेस पार्टी अडेंट करण्यासाठी मुंबईला बोलवण्यात आले होते. मात्र शाहिदने तिकडे न जाता फॅमिलीसोबत टाईम स्पेंट केला.शाहिदच्या एका जवळच्या व्यक्तीने सांगितले की शाहिद कुटुंबीयाला देण्यात येणाऱ्या वेळामध्ये कधीच तडजोड नाही करत  आपल्या बर्थडे वीकमध्ये शाहिदला कोणताच प्रोब्लेम नको आहे.उद्या तो अमृतसरला जाणार आहे. 
 
ALSO READ :  Padmavat Box Office Collection : ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये ‘पद्मावत’ला स्थान; वाचा आतापर्यंतचे कलेक्शन!
 
'बत्ती गुल मीटर चालू’ हा चित्रपट वीज चोरीवर आधारित आहे. वीज कंपनीच्या पायºया झिजवणाºया सामान्य माणसाची कथा यात दिसणार असल्याचे कळते. शाहिदची पत्नी मीरा कपूर हिला या चित्रपटाची कथा भलतीच आवडली होती आणि तिनेच या चित्रपटासाठी शाहिदला राजी केल्याचे मानले जाते. या चित्रपटात अभिषेक बच्चनही लहानशा भूमिकेत दिसणार असल्याची खबर आहे. या चित्रपटात अभिनेत्रीची भूमिकाही शाहिद कपूरच्याच तोडीची असल्याचे कळतेय.  चित्रपटातील अभिनेत्रीला एका खास पद्धतीच्या एक्सेंटमध्ये बोलावे लागणार आहे. 

Web Title: Shahid Kapoor in work and family failed?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.