चांगली स्क्रीप्ट मिळाली तर शाहिद कपूर नक्कीच ह्या व्यक्तीसोबत करेल काम

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2018 01:14 PM2018-09-10T13:14:59+5:302018-09-10T13:25:44+5:30

शाहिद कपूर आपला भाऊ ईशान खट्टरच्या जास्त जवळ आहे. याच कारणामुळे ईशानने पहिला चित्रपट साइन करण्यापासून चित्रपटसृष्टीतील करियरच्या बाबतीतील त्याच्या प्रत्येक निर्णयात शाहिदचा महत्त्वाचा वाटा आहे. जर भविष्यात ईशान आणि मला चांगली स्क्रीप्ट मिळाली तर त्या सिनेमात नक्कीच काम करू असे शाहिदने सांगितले. 

Shahid Kapoor will definitely work with this person if he got good script | चांगली स्क्रीप्ट मिळाली तर शाहिद कपूर नक्कीच ह्या व्यक्तीसोबत करेल काम

चांगली स्क्रीप्ट मिळाली तर शाहिद कपूर नक्कीच ह्या व्यक्तीसोबत करेल काम

googlenewsNext
ठळक मुद्देईशान घेतो शाहिदचे सल्लेईशान शाहिदपेक्षा जवळपास पंधरा वर्षे लहान शाहिदला करायचंय ईशानसोबत काम

शाहिद कपूर आपला भाऊ ईशान खट्टरच्या जास्त जवळ आहे. याच कारणामुळे ईशानने पहिला चित्रपट साइन करण्यापासून चित्रपटसृष्टीतील करियरच्या बाबतीतील त्याच्या प्रत्येक निर्णयात शाहिदचा महत्त्वाचा वाटा आहे. जर भविष्यात ईशान आणि मला चांगली स्क्रीप्ट मिळाली तर त्या सिनेमात नक्कीच काम करू असे शाहिदने सांगितले. 
शाहिदला नुकतेच डीएनएला दिलेल्या मुलाखतीत ईशानसोबत कोणत्या सिनेमासाठी विचारण्यात आले आहे का, असे विचारल्यावर तो म्हणाला की, मी व ईशानने एकत्र काम करण्यासाठी स्क्रीप्ट शोधणे खूप कठीण असेल. मी जेव्हापासून माझ्या फिल्मी करियरला सुरूवात केली तेव्हापासून मला माझे वडील पंकज कपूर यांच्यासोबत काम करायचे होते. मात्र मला ही संधी बऱ्याच कालावधीनंतर मिळाली. तीही शानदार व मौसम या सिनेमातून. जर भविष्यात ईशान व मला चांगली स्क्रीप्ट मिळाली तर त्या सिनेमात नक्कीच काम करेन. मात्र अद्याप असे काहीही झालेले नाही. 

शाहिद कपूर ईशानला खूप चांगला अभिनेता व डान्सर मानतो. त्याचे म्हणणे आहे की ज्याप्रकारे ईशान सिनेमांना घेऊन उत्साही आहे. ते पाहून मला माझ्या सुरूवातीचे दिवस आठवतात. ईशानचे कामाप्रती असलेली निष्ठा पाहून मी खूप खूश आहे. ईशान खूप चांगला डान्सर आहे. तो नेहमी माझ्यासोबत चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान किंवा फोटोशूटवेळी वा डान्स रिहर्सलवेळी उपस्थित असायचा. त्यामुळेच कदाचित तो खूप गोष्टी शिकला आहे. त्याला पाहून मला खूप अभिमानास्पद वाटते.
ईशान शाहिदपेक्षा जवळपास पंधरा वर्षे लहान आहे. त्यामुळेच शाहिद त्याला आपला छोट्या भावासारखा मानतो. ईशानने धडक चित्रपटातून खूप प्रशंसा मिळवली आहे.या सिनेमानंतर त्यान अद्याप कोणताही सिनेमा साइन केलेला नाही. मात्र तो चांगल्या स्क्रीप्टच्या शोधात आहे.

Web Title: Shahid Kapoor will definitely work with this person if he got good script

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.